शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:22 IST

अहेरी आणि भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहे.

मोठा हादरा : भामरागड व अहेरी तालुक्यातील पराभूत उमेदवारांचा समावेश अहेरी : अहेरी आणि भामरागड तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी व भामरागड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकही बैठक घेतली नाही, प्रचार दौरा केला नाही, सभा घेतली नाही, पदाधिकाऱ्यांची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत असणाऱ्या नेते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे पाठविले आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गावडे, अहेरी तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उषा आत्राम, अनुसूचित जाती सेलचे अहेरी तालुका अध्यक्ष सामप्रसाद मुंजमकर, काँग्रेसचे जि.प. उमेदवार लैजा बालाजी गावडे, लक्ष्मी रामचंद्र उरेत, भगवान मंगा मडावी, सुरेश समय्या सोयाम, बुज्जीताई पोशांना तोरेम, मनिषा तुंगलवार, भामरागडचे राजू मुरा आत्राम, जेनी पुसू पुंगाटी, बेबी केशव परसा यांचा समावेश आहे. हे पदाधिकारी व उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढले. त्यांना पक्षाकडून कोणतीही प्रचार सामुग्री देण्यात आली नाही. पक्षाचा कोणताही नेता त्यांच्यांशी संवाद साधण्यासाठी गेला नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून काँग्रेस पक्षात असूनही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा अहेरी, भामरागड तालुक्यात दारूण पराभव झाला, असे सांगून त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. (शहर प्रतिनिधी)