The condition of Markandadev-Chamorshi road remains bad | मार्कंडादेव-चामोर्शी मार्गाची दुरवस्था कायम

मार्कंडादेव-चामोर्शी मार्गाची दुरवस्था कायम

चामोर्शी हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून विविध शासकीय कार्यालये आहेत. बाजारपेठ तसेच शाळा, महाविद्यालये आहेत. मार्कंडादेव, फराडा, मोहुर्ली व या परिसरातील अनेक नागरिक दररोज चामोर्शी तालुका मुख्यालयी येतात. चामाेर्शी ते मार्कंडा हेटी मार्गाला जाेडणाऱ्या मार्कंडादेव मार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. पावसाळ्यात हा भाग वैनगंगेच्या पुराने व्यापला हाेता. ज्या ठिकाणी पूर आला तेथील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. जड वाहनांमुळे उंचवटे निर्माण झाले आहेत. सध्या यातून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मार्कंडादेव हे जिल्ह्यातील माेठे धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची वर्दळ राहते. या मार्गाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. मात्र नागरिकांच्या मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसराच्या नागरिकांमध्ये तीव्र राेष आहे.

Web Title: The condition of Markandadev-Chamorshi road remains bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.