शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांनी केली अन्यायकारक जीआरची हाेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

काेरची : तालुक्यातील २९ ग्रामपंचायती असून २६ संगणक परिचालकांनी १४ जानेवारी २०२१ च्या अन्यायकारक शासननिर्णयाची काेरची येथे हाेळी करून ...

काेरची : तालुक्यातील २९ ग्रामपंचायती असून २६ संगणक परिचालकांनी १४ जानेवारी २०२१ च्या अन्यायकारक शासननिर्णयाची काेरची येथे हाेळी करून शासनाच्या धाेरणाचा निषेध केला. शासनाने केलेल्या तुटपुंज्या मानधनवाढीच्या निर्णयाविराेधात पंचायत समितीसमाेर नारेबाजी करण्यात आली.२०११ पासून महाराष्ट्र शासनाने ई-पंचायत प्रकल्‍प अंतर्गत संग्राम प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पांतर्गत संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली. सध्या हाच प्रकल्प ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने चालवण्यात येत असून मागील दहा वर्षांपासून हे संगणक परिचालक नाममात्र पगारावर सेवा देत आहेत.परंतु त्याचा शासनाने अजूनपर्यंत पाहिजे तसा मोबदला यांना दिला नाही. नेहमीच शासनकर्त्यांनी आश्‍वासने दिली परंतु आश्वासन अजून पर्यंत पूर्ण झाले नाही. संगणक परिचालकांनी अनेकदा आंदोलने केलेले आहेत. ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांना पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अशी एकच मागणी परिचालक व संघटनेच्या वतीने करण्यात आली. परंतु शासनाने यावर निर्णय न घेता केवळ मानधनामध्ये एक हजार रुपये वाढ करून ताेंडाला पाने पुसली आहे. या निर्णयाच्या विराेधात २५ जानेवारी राेजी कोरची पंचायत समितीसमोर संगणक परिचालक यांनी जाहीर निषेध करून आंदोलन केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी व शासनाकडे केलेल्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष विकास उंदीरवाडे, उपाध्यक्ष प्रदीप नंदेश्वर, सचिव भूपेंद्र कोसारे व इतर संगणक परिचालक उपस्थित हाेते.

बाॅक्स....

ऑनलाईन कामांचा भार ऑपरेटरवरच

मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक पदावर अनेक युवक, युवती कार्यरत असून तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पूर्ण ऑफलाईनचे कामे ऑनलाईन करण्याचे काम संगणक परिचालक करीत आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत येणार सर्वच प्रकारचा लेखा-जोखा ऑनलाईन करणे, ग्रामसभांना सर्व प्रकारचे दाखले देणे, शासनाने कोअर अप्लिकेशन व ग्रामपंचायत डाटा ऑनलाईन करणे, शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक योजना ग्रामपंचायतस्तरावर राबविणे, अशा विविध प्रकारचे कामे परिचालकांकडून केले जात आहेत.