शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना चटाेपाध्याय वेतनश्रेणीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भेंडाळा : जि.प. शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांना चटाेपाध्याय समिती वेतनश्रेणी सक्तीची करून त्यांच्याकडून फाॅर्म भरण्यास सुरूवात करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भेंडाळा : जि.प. शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांना चटाेपाध्याय समिती वेतनश्रेणी सक्तीची करून त्यांच्याकडून फाॅर्म भरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. चटाेपाध्याय वेतनश्रेणी लागू झाल्यास जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनात ८ ते १० हजारांनी घट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या सक्तीला विराेध दर्शविला आहे.

राज्यातील नक्षलग्रस्त, आदिवासी जिल्ह्यांसाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत ६ ऑगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार काही लाभ प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. परंतु १२ व २४ वर्षांची सेवा झालेल्या शिक्षकांना चटाेपाध्याय वेतनश्रेणी लागू केली जाते. शिक्षकाला चटाेपाध्याय किंवा एकस्तर या दाेन पैकी एकाच याेजनेचा लाभ घेता येतो. चटाेपाध्याय लागू हाेताच संबंधित शिक्षकाला एकस्तरचा लाभ मिळणे बंद हाेते. त्यामुळे वेतन आठ ते दहा हजार रूपयांनी कमी हाेते. परिणामी अनेक शिक्षक चटाेपाध्याय वेतनश्रेणीचे अर्ज भरून देण्यास तयार नाहीत. असे असतानाही त्यांच्यावर चटाेपाध्याय वेतनश्रेणीची सक्ती केली जात आहे. काही तालुक्यात चटोपाध्याय वेतनश्रेणीचा प्रस्ताव न दिल्यास शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस व वेतन कपात, वेतनवाढ बंद, शिस्तभंगाची कारवाई अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत ज्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ नको अशा शिक्षकांकडूनसुद्धा जबरदस्तीने प्रस्ताव मागणे हा शिक्षकांवरील अन्याय आहे. असा शिक्षकांमध्ये सूर आहे.

काेट

१२ व २४ वर्षांची सेवा झाल्यानंतर चटाेपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी राज्यभरात केली जाते. तीच अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे. काही शिक्षक चटाेपाध्यायचे अर्ज भरून देत आहेत. तर काही शिक्षक वेतन कमी हाेत असल्याने चटाेपाध्यायचे अर्ज भरून देण्यास तयार नाही.

हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली