शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चालू सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

गुरुवारी (दि. २८) गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राबाबत अहेरी येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अहेरीचे आमदार धर्मरावबाबा ...

गुरुवारी (दि. २८) गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राबाबत अहेरी येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आदिवासी विकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते, चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, तहसीलदार ओंकार ओतारी व पाटबंधारे विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी या नदीतून मुबलक प्रमाणात पाणी वाहात जाते. या भागात पाणी अडवून किंवा उपसा करून सिंचन प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करता येईल, असे पाटील म्हणाले.

(बॉक्स)

तर १.८३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पूर्ण व चालू स्थितीतील ६१ सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला. जिल्ह्यात पूर्ण झालेले प्रकल्प एकूण ३० आहेत. यातून आता ३४ हजार ३१९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात दोन मोठे सिंचन प्रकल्प, एक बॅरेज, सात लघु, १५ मामा तलाव व पाच उपसा सिंचन प्रकल्प आहेत तसेच सध्या आठ प्रकल्प बांधकामाधीन आहेत. येत्या दोन वर्षात ते पूर्ण झाल्यास २५ हजार ७५७ हेक्‍टर सिंचन क्षेत्रात वाढ होईल. यामध्ये ५ उपसा सिंचन योजना, १ बॅरेज व २ लघु प्रकल्प आहेत. अशाप्रकारे पूर्ण झालेले व चालू तसेच अन्वेषणाधीन प्रकल्प मिळून ६१ सिंचन प्रकल्पातून जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १२ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.