घरकूल योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करा
By Admin | Updated: August 13, 2014 23:51 IST2014-08-13T23:51:55+5:302014-08-13T23:51:55+5:30
इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचे सन २०१४-१५ या वर्षाकरीता गडचिरोली पंचायत समितीला ग्रामपंचायतनिहाय शासनाकडून उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे घरकूल

घरकूल योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करा
गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचे सन २०१४-१५ या वर्षाकरीता गडचिरोली पंचायत समितीला ग्रामपंचायतनिहाय शासनाकडून उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे घरकूल बांधकामकरीता लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन गडचिरोली पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी केले आहे.
गडचिरोली तालुक्यात एकूण २२ ग्रामपंचायतीच्या गावात इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यानुसार तालुक्यातील धुंडेशिवणी ग्रामपंचायतमध्ये २, भिकारमौशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत २९, चूरचूरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत २८, दिभना १८, बामणी ४, काटली ६, खुर्सा १०, बोदली ५, वसा १०, शिवणी १२, पारडी १, मेंढा २४, अमिर्झा ११, कोटगल ३, मुरमाळी ३७, मुरखळा ६, विहिरगाव ३९, मौशीखांब १७, टेंभा १४, कनेरी ३०, मरेगाव १४ व आंबेशिवणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावात २ घरकूलाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १०० रूपयाच्या स्टॅम्पवर करारनामा, घरटॅक्स पावती, रेशन कार्ड/मतदान कार्ड, बीपीएल दाखला, रहिवासी दाखला, नमुना ८ अ, बँक खाता क्रमांकाची झेरॉक्स प्रत या कागदपत्राची पूर्तता करावी.