शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भामरागड संपर्कात, आता आरोग्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 6:00 AM

यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील इतर नागरिक गाढ झोपेत होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची भेट : घरे, दुकानांच्या तळमजल्यावर चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहात असल्याने गेल्या आठवडाभरापासून संपर्काबाहेर असलेल्या आणि गावात पाणी शिरल्याने हाह:कार उडालेल्या भामरागडला मंगळवारी सकाळी दिलासा मिळाला. गावातील पाणी ओसरण्यासोबतच पर्लकोटावरील पुलाने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांचा आणि प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. आता गावात स्वच्छता ठेवण्यासोबत शुद्ध पाणी पुरवठा करणे आणि आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान कायम आहे.यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील इतर नागरिक गाढ झोपेत होते. अशातच पाणी शिघ्र गतीने वाढत असल्याने घरातील सामान काढण्यासाठीही नागरिकांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला असला तरी मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य खराब झाले, गाळ व कचºयाची दुर्गंधी येवू नये आणि बीमारी पसरू नये या हेतूने तहसीलदार कैलास अंडील, एसडीपीओ डॉ. कुणाल सोनवने यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरूवात झाली.लोकबिरादरी टीमचे श्रमदानतब्बल पाच दिवसांनी १० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता नदीपुलावरील पूर ओसरला. मात्र भामरागडमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार अंडील यांनी श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन सर्वांना केले. त्याला प्रतिसाद देत हेलकसा येथील लोकबिरादरी टीमने अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर व सचिन मुक्कावार यांच्या नेतृत्वात श्रमदान केले. यात लोकबिरादरीतील कर्मचारी व कार्यकर्ते तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे काही विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी साचलेला गाळ उचलला. चिखलाने घसरण झालेला रस्ता पाण्याने धुवून काढला. बाजारपेठेत साचलेला कचरा उचलला. स्थानिक दुकानदारांना सामान हलविण्यास मदतही केली. या टीममध्ये मुख्याध्यापक शरिफ शेख, अधीक्षक अशोक चापले, क्र ीडा शिक्षक विवेक दुबे, प्रा.गिरीश कुलकर्णी, प्रा.खुशाल पवार, शिक्षक सुरेश गुट्टेवार, तुषार कापगते, जमीर शेख, श्रीराम झोडे, प्रकल्पातील कार्यकर्ते प्रफुल्ल पवार, अशोक गायकवाड, केतन फडणीस, गोपाळ बारदेव, दीपक मेश्राम, गणेश हिवरकर आदींचा सहभाग होता. मुकेश ठेकेदार यांनी स्वत:चे डिजेल इंजिन लावून पाण्याची सोय करून दिली आणि पूर्णवेळ श्रमदानही केले. 

टॅग्स :floodपूरRainपाऊस