भामरागडमध्ये ६० आदिवासी जोडप्यांचे सामूहिक शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:08 PM2017-11-17T23:08:49+5:302017-11-17T23:09:07+5:30

ज्या आदिवासी युवक-युवतींचे रितसर लग्न होण्याची शाश्वती नसते, त्यामुळे ज्यांच्यात कधी वितुष्ट आल्यास पती-पत्नीचा कायदेशिर हक्क मिळण्याची शक्यता नसते, ...

The collective Shubhamangal of 60 tribal couples in Bhamragad | भामरागडमध्ये ६० आदिवासी जोडप्यांचे सामूहिक शुभमंगल

भामरागडमध्ये ६० आदिवासी जोडप्यांचे सामूहिक शुभमंगल

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस व आदिवासी विभागाचा उपक्रम : विविध भेटवस्तूंसह शासकीय अनुदानही दिले

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : ज्या आदिवासी युवक-युवतींचे रितसर लग्न होण्याची शाश्वती नसते, त्यामुळे ज्यांच्यात कधी वितुष्ट आल्यास पती-पत्नीचा कायदेशिर हक्क मिळण्याची शक्यता नसते, अशा तब्बल ६० जोडप्यांचे कायदेशिर सोपस्कार पार पाडत विवाह लावून देण्याचे काम शुक्रवारी भामरागड पोलीस स्टेशन व आदिवासी प्रकल्प कार्यालयाने केले.
पांढºया शुभ्र कपड्यातील नवरदेव आणि हिरव्या साडीतील वधू आणि त्यांची वाजतगाजत निघालेली वरात भामरागडवासीयांसाठी कुतूहलाचा विषय झाली होती. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यानंतर त्याच ठिकाणी सर्व जोडप्यांना विवाह नोंदणीची प्रमाणपत्रे, कन्यादान योजनेचा धनादेश देण्यात आले.
भामरागड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक अंजली राजपूत यांनी या सोहळ्यासाठी विशेष पुढाकार घेतला. येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे कन्यादान योजनेचा ५ लाखांचा निधी होता. तो कसा उपयोगी लावायचा आणि नागरिकांना कसा लाभ द्यायचा असा प्रश्न प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांच्यापुढे होता. त्यांनी यासंदर्भात पो.निरीक्षक राजपूत यांच्याशी चर्चा करताच त्यांनी पुढाकार घेत आपल्या यंत्रणेमार्फत परिसरातील गावांना सूचना करून आदिवासी समाजातील विवाहेच्छुक जोडप्यांचा शोध लावला. त्यांची सर्व माहिती मिळवून त्यांचे जन्माचे दाखले, वधुचे बँक खाते काढण्यापासून सर्व तयारी केली.

Web Title: The collective Shubhamangal of 60 tribal couples in Bhamragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.