शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:26 IST

जि.प. अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने दोन दिवशीय सामूहिक रजा आंदोलन सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू करण्यात आले.

ठळक मुद्दे१०५ अभियंते सहभागी : विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर मांडला ठिय्या

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जि.प. अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने दोन दिवशीय सामूहिक रजा आंदोलन सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू करण्यात आले.जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता देणे, जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना प्रवासभत्त्यापोटी दरमहा किमान १० हजार रूपये मासिक वेतनासोबत अदा करणे, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग निर्माण करणे, जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्याबाबत करावयाची वेतन निश्चिती, जलसंपदा विभागाकडील ६ डिसेंबर २०१४ रोजीच्या निर्णयाप्रमाणे करण्याबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश निर्गमित करणे, जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्तपदे विशेष बाब म्हणून भरणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदांच्या प्रमाणात पुनर्विलोकीत करणे, जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गास अतांत्रिक कामे न देण्याबाबत आदेश निर्गमित करणे, जिल्हा परिषदेतील अभियंता संवर्गासाठी जीवनदायी आरोग्य विमा योजना (कॅशलेस मेडिक्लेम) लागू करणे, कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेले २१ एप्रिल २००६ चे परिपत्रक रद्द करणे आदी मागण्यांसाठी अभियंता संवर्ग संघटनेच्या वतीने जि.प. समोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील १०५ अभियंता सामूहिक रजा घेऊन सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील बांधकामाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष भूजंग हिरे, डी.एम.वाडेकर, जुआरे यांच्यासह सदस्य सहभागी झाले आहेत.