शतकी संयोग ! एकाच महिन्यात दोन पौर्णिमा, सण साजरे करा दोन दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:43 IST2025-08-06T19:40:34+5:302025-08-06T19:43:18+5:30

दोन पौर्णिमा : ज्योतिष अभ्यासक म्हणतात, पहिल्यांदाच शुभ योग

Coincidence of the century! Two full moons in the same month, celebrate the festival for two days | शतकी संयोग ! एकाच महिन्यात दोन पौर्णिमा, सण साजरे करा दोन दिवस

Coincidence of the century! Two full moons in the same month, celebrate the festival for two days

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी :
श्रावण महिन्यात एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आहेत. ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा तर ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन (श्रावण पौर्णिमा) साजरी केली जाणार आहेत. खूप वर्षानंतर आलेला हा दुहेरी योग आणि शुभ नक्षत्रांचा संयोग या सणांना अधिक महत्त्वपूर्ण बनवत आहे.


दरवर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी येतात; मात्र यावर्षी वेगवेगळ्या दिवशी आले आहेत. यावर्षी पौर्णिमेची तिथी दोन दिवस असल्यामुळे हा योग जुळून आला आहे. यावेळेस भद्राकाळ नसल्यामुळे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण अधिक शुभ ठरत आहे. यंदाचा श्रावण पौर्णिमेचा सण दोन दिवस साजरा करता येणार आहे. त्यामुळे महिलांसह चिमुकल्यांमध्ये उत्सुकता आहे.


रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग
या दिवशी, सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग आणि रवी योग हे तीन शुभ योग एकत्र येत आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी महिलांमध्ये आत्तापासूनच उत्साह निर्माण झाला आहे. बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली असून यामध्ये महिलांची वर्दळ दिसून येत आहे. 


या शुभमुहूर्तावर बांधा राखी
श्रावण पौर्णिमा शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत असून, शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे. ९ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तररात्री २ वाजून ११ मिनिटांनी पंचक सुरू होत आहे. त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू होण्यापूर्वी रक्षाबंधन करावे.


यंदा पौर्णिमा दोन दिवस
यंदा श्रावण महिन्यात एक विशेष संयोग पाहायला मिळत आहे. पंचांगानुसार नारळी पौर्णिमा ८ ऑगस्ट रोजी तर रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.


'भद्रा'काळ सोडून राखी बांधणे मानले जाते महत्त्वाचे
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ नाही. भद्राकाळ शुभ कार्यासाठी अशुभमानला जातो; परंतु ८ ऑगस्ट रोजीच भद्राकाळाची अशुभ छाया संपेल, त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ आहे.


बऱ्याच्या वर्षांनंतर आला दुहेरी योग
दोन्ही दिवशी पौर्णिमा असल्यामुळे या वेळेस दुहेरी सणाचा योग जुळून आला आहे. धार्मिक दृष्टीने हा योग अत्यंत शुभमानला जातो.


श्रावण नक्षत्र मानले जाते शुभ
श्रावण महिन्यात येणारे श्रावण नक्षत्र भगवान शंकराच्या पूजेसाठी आणि रुद्राभिषेक करण्यासाठी खूप शुभमानले जाते.


"भावांना राखी बांधण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. या दुहेरी योगामुळे यंदाचा रक्षाबंधनाचा सण अधिक मंगलमय होणार आहे. हा संयोग अनेक वर्षांनी प्रथमच घडलेला आहे."
- राजेश उपाध्याय, पंडित, आरमोरी

Web Title: Coincidence of the century! Two full moons in the same month, celebrate the festival for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.