नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे

By Admin | Updated: January 28, 2015 23:33 IST2015-01-28T23:33:31+5:302015-01-28T23:33:31+5:30

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले.

Civilians must obey the rules of transport | नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे

गडचिरोली : दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले.
स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला होता. या सप्ताहाच्या समारोपानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष निर्मला मडके, प्राचार्य संजय भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, डॉ. अद्वय अप्पलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरक्षा सप्ताहादरम्यान निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
निबंध स्पर्धेत गट ‘अ’ मध्ये रिया बाळकृष्ण नंदागवडी प्रथम तर पार्थ हर्षल बदखल याने द्वितीय क्रमांक पटकाविला. ‘ब’ गटात प्रथम क्रमांक दक्षिता संजय कस्तुरे, द्वितीय क्रमांक इशांत यादव बानबले व टिष्ट्वंकल हरिदास पिपरे तर तृतीय क्रमांक निखिल मुकुंदा भोयर यांनी पटकाविला. ‘क’ गटातून प्रथम क्रमांक केतन प्रभाकर देशमुख, द्वितीय क्रमांक वंदना रामेश्वर रमकेशर, शीतल मुकुंदा भोयर, तृतीय क्रमांक सोनी रोहिदास बावणे यांनी पटकाविला.
चित्रकला स्पर्धेत ‘अ’ गटातून निलोज नरोटे प्रथम, लोकेश कोराम द्वितीय, पार्थ हर्षल बदखल याने तृतीय क्रमांक पटकाविला. ‘ब’ गटातून करण दिनकर शेडमाके प्रथम, द्वितीय अशोक यादव बानबले तर तृतीय क्रमांक मोहीत मडावी याने पटकाविला. ‘क’ गटातून प्रथम क्रमांक भाग्येश चंद्रभान राऊत, द्वितीय क्रमांक प्रणिता शंकरराव माकडे, तृतीय क्रमांक पल्लवी तुळशीराम मोरांडे यांनी पटकाविला.
प्रास्ताविकादरम्यान वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी प्रशांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांविषयी सविस्तर मार्गदर्श केले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे हाच एकमेव उपाय आहे. वाहतुकीचे नियम अंगवळणी पाडावे, असेही मार्गदर्शन केले.
संचालन मोटार वाहन निरीक्षक इंगवले यांनी केले. यशस्वीतेसाठी गडचिरोली शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Civilians must obey the rules of transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.