शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.

ठळक मुद्देखंडाळा गावात विजेची समस्या तीव्र्र : शिपायाकडे निवेदन ठेवून संतप्त नागरिक परतले

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा गावालगतच्या खंडाळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असून लपंडावही वाढला आहे. ही समस्या गंभीर झाल्याने गावातील नागरिकांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास भेंडाळा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या कार्यालयात धडक दिली.दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांनी शिपायाजवळ निवेदन ठेवून निघून गेले.निवेदनावर कैलास सातपुते, संदीप सातपुते, श्रीनिवास सातपुते, आकाश सातपुते, तानाजी चलाख, लालाजी सातपुते, विकास चलाख, हिवराज सातपुते, आयुश सातपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.आष्टी भागात विजेचा लपंडाव, नागरिक हैराणजिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी परिसरात गेल्या चार महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळेला वारंवार वीज प्रवाह खंडित होत असल्याने आष्टी गावातील व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.सध्या इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. मात्र रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अभ्यास होत नसल्याने गुणांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अनेक नागरिक व पालकांनी ही समस्या मांडली होती. मात्र कार्यवाही झाली नाही.परिसरातील रामपूर, कोनसरी, रामकृष्णपूर, अनखोडा, येनापूर, अडपल्ली, गुंडापल्ली, चंदनखेडी, चौडमपल्ली, जयरामपूर व सिंघमपल्ली आदी गावात शिकारीचे प्रमाण वाढली असल्याची चर्चा सुरू आहे. तारेवरील वीज प्रवाह जंगलात सोडून शिकार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. वन्यप्राणी शिकारीचे प्रमाण वाढल्यामुळेच वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण