शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमुळे काेराेना प्रतिबंधात्मक लसविषयी भीती असल्याने नागरिक लस घेत नव्हते. त्यानंतर प्रशासनाने नागरिकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केल्याने लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. जवळपास एप्रिल महिन्यापासून बऱ्या प्रमाणात लसीकरण हाेऊ लागले. ग्रामीण भागातील नागरिकही लस घेत हाेते. 

ठळक मुद्देग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामात व्यस्त

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जुलै महिन्यापासून धान राेवणीच्या कामाला सुरुवात झाली असल्याने या कालावधीत काेराेना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमुळे काेराेना प्रतिबंधात्मक लसविषयी भीती असल्याने नागरिक लस घेत नव्हते. त्यानंतर प्रशासनाने नागरिकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केल्याने लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. जवळपास एप्रिल महिन्यापासून बऱ्या प्रमाणात लसीकरण हाेऊ लागले. ग्रामीण भागातील नागरिकही लस घेत हाेते. मात्र जुलै महिन्यापासून राेवणीच्या कामाला सुरुवात झाल्याने लसीकरणाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. काेराेनाची लस घेतल्यानंतर अंगदुखीचा त्रास एक ते दाेन दिवस हाेतो. राेवणीच्या कालावधीत दाेन दिवस घरी राहणे शक्य हाेत नाही. त्यामुळे गावात शिबिरांचे   आयाेजन  करूनही  नागरिक लस घेत नसल्याचे दिसून येत आहे. 

एक दिवस घरी थांबणेही हाेते अशक्यकाेराेनाची लस घेतल्यानंतर अनेक नागरिकांनी अंगदुखीचा त्रास जाणवला. काही नागरिकांना तर थंडी वाजून तापसुद्धा येतो. सध्या धान राेवणीच्या हंगाम सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेतात काम करावे लागते. अशास्थितीत ताप आला म्हणून घरी थांबणे कठिण हाेते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक व शेतकरी लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे.  

२६ जून ते २ जुलैच्या आठवड्यात विक्रमी लसीकरण

- २६ जून ते २ जुलै या आठवड्यात आजपर्यंतच्या कालावधीतील सर्वाधिक लसीकरण झाले असल्याचे दिसून येते. या आठवड्यात ४१ हजार १९७ नागरिकांनी पहिला डाेज, २ हजार ३४३ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे. त्यानंतर मात्र लस घेण्याचे प्रमाण कमी हाेण्यास सुरुवात झाली. - त्यानंतरच्या आठवड्यात १४ हजार ८०२ नागरिकांनी पहिला डाेज तर १ हजार ९४८ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे. राेवणीनंतर लसीकरण पुन्हा वेग घेईल.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसFarmerशेतकरी