इतिहास अभ्यासक्रमावर मंथन
By Admin | Updated: August 13, 2014 23:53 IST2014-08-13T23:53:26+5:302014-08-13T23:53:26+5:30
येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठस्तरीय पाचवे व सहावे सेमिस्टर इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची कार्यशाळा नुकतीच पार पडली.

इतिहास अभ्यासक्रमावर मंथन
चामोर्शी : येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठस्तरीय पाचवे व सहावे सेमिस्टर इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत इतिहास विषयाच्या अध्यापन पद्धतीसोबतच इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर विचारमंथन घडून आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शेंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव देवराव पाटील म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश शेंडे यांनी पाचव्या व सहाव्या सेमिस्टरच्या इतिहास अभ्यासक्रमावर प्राध्यापकांकडून प्राप्त झालेल्या शंकांचे निरसन केले. तसेच इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांत गोडी निर्माण करण्यासाठी उदाहरण व दाखल्यांचा अधिक वापर करावा, असे सांगितले.
याप्रसंगी देवराव पाटील म्हशाखेत्री यांनी विदर्भाची काशी असलेल्या मार्र्कंडादेव परिसरातील देवतळे महाविद्यालयात इतिहास विषयाच्या प्राध्यापकांची कार्यशाळा घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. इतिहासाच्या प्राध्यापकांनी गडचिरोली जिल्ह्याचा स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहासही अभ्यासावा, असे आवाहन म्हशाखेत्री यांनी यावेळी केले.
प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे प्रास्ताविकात म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाने इतिहास विषयासाठी सेमिस्टर पद्धत लागू केली आहे. त्यामुळे या विषयाच्या प्राध्यापकांना इतिहास विषयाची माहिती तसेच परीक्षा पद्धतीबाबत सखोल माहिती असने गरजेचे आहे. तेव्हाच इतिहास विषयाचा प्राध्यापक अध्यापनात यशस्वी होऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. बीए अंतिम वर्षाच्या पाचवे व सहावे सेमिस्टरच्या चर्चासत्रात प्राध्यापक घनश्याम सोनवने, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. रश्मी बेड, डॉ. दिवाकर कामडी, डॉ. घोनमोडे, डॉ. शंभरकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. भूपेश चिकटे होते. यावेळी प्रा. घनश्याम सोनवाने, प्रा. शरद बेलोरकर, प्रा. दशरथ आदे आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे संचालन प्रा. हटवार यांनी केले तर आभार प्रा. राजेंद्र झाडे यांनी मानले. या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठातील इतिहास विषयाचे बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी देवतळे महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)