कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ ठार

By Admin | Updated: August 30, 2014 01:26 IST2014-08-30T01:26:33+5:302014-08-30T01:26:33+5:30

वनरक्षक, वनपाल यांच्या संपामुळे चपराळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या जीवासही धोका निर्माण झाला आहे.

Chital killed in a dog attack | कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ ठार

कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ ठार

आष्टी : वनरक्षक, वनपाल यांच्या संपामुळे चपराळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या जीवासही धोका निर्माण झाला आहे. मार्र्कंडा (कं.) गावाजवळ चार मोकाट कुत्र्यांनी ९ वर्षीय मादी चितळाचा पाठलाग करून त्याला ठार केले. या १५ दिवसातील चितळ ठार होण्याची ही दुसरी घटना आहे.
मार्र्कंडा (कं.) गावाजवळ ४ गावठी मोकाट कुत्र्यांनी चितळाचा पाठलाग करून त्याला गुरूवारी सकाळी १० वाजता जखमी केले. त्यानंतर जखमी चितळाला तेथील रोजंदारी वनकर्मचाऱ्यांनी चितळाला उचलून आष्टी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोयर हे हजर नसल्याने चितळावर वेळेवर उपचार होऊ शकला नाही. मोकाट कुत्र्यांनी चितळाच्या मान व पाठीवर हल्ला केला होता. परिणामी अतिरक्तस्त्राव होऊन २९ आॅगस्टच्या सकाळी ९ वाजता चितळाचा मृत्यू झाला. घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्राधिकारी बडोदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर चितळाचे शव कक्ष क्रमांक २२६ मधील जंगलात खड्डा खोदून पुरण्यात आले. १५ दिवसापूर्वीही पेपरमिल कॉलनीलगत एका चितळाचा मृत्यू कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Chital killed in a dog attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.