शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या श्रमदानातून चिन्नावट्रा रस्त्याची दुरूस्ती

By admin | Updated: October 17, 2016 02:07 IST

अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत व्यंकटापूर-चिन्नावट्रा या अहेरीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती.

प्रेरणादायी उपक्रम : ग्रामस्थांनीही केले सहकार्यआलापल्ली : अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत व्यंकटापूर-चिन्नावट्रा या अहेरीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. तक्रार करूनही संबंधित प्रशासनाने या रस्त्याची दुरूस्ती केली नाही. अखेर पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून शुक्रवारी श्रमदान करून सदर रस्त्याची पक्की दुरूस्ती केली. व्यंकटापूर-चिन्नावट्रा-पेदावट्रा या कच्च्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. खडीकरण पूर्णत: उखडले होते. त्यामुळे राज्य परिहवन महामंडळाच्या बस वाहतुकीसह खासगी प्रवासी वाहतूकही प्रचंड प्रभावित होत होती. परिणामी व्यंकटापूर, चिन्नावट्रा येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. पक्क्या रस्त्याअभावी वाहतूक व्यवस्था प्रभावित झाल्याने या भागातील काही व्यक्तींना वेळेवर औषधोपचार मिळाला नाही. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच मागील काही दिवसात औषधोपचाराअभावी लहान मुले दगावल्याच्या अनेक घटनाही व्यंकटापूर भागात घडल्या. रस्त्याअभावी वाहतुकीची साधनेही या भागात उपलब्ध होत नव्हती. परिणामी नागरिकांना पायी प्रवास करावा लागत होता. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनात व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, अधिकारी व चिन्नावट्रा व व्यंकटापूरच्या नागरिकांनी श्रमदानातून या रस्त्याची पक्की दुरूस्ती केली. याकरिता व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, अनिकेत हिवरकर, शहाजी गोसावी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)