गडचिरोलीत कारमध्ये गुदमरून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 20:04 IST2020-05-24T20:04:14+5:302020-05-24T20:04:39+5:30
खेळता-खेळता कारमध्ये शिरल्यानंतर कारचा दरवाजा बंद झाल्याने गुदमरून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी गडचिरोली येथील इंदिरा नगरात घडली.

गडचिरोलीत कारमध्ये गुदमरून बालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खेळता-खेळता कारमध्ये शिरल्यानंतर कारचा दरवाजा बंद झाल्याने गुदमरून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी येथील इंदिरा नगरात घडली.
भूषण महेश कुकुडकर (३ वर्ष) असे मृतक बालकाचे नाव आहे. खेळताना भूषण हा घराच्या बाजूला असलेल्या बंद कारमध्ये शिरला. कारमध्ये बसल्यानंतर कारचा दरवाजा बंद झाला. त्याला दरवाजा उघडता येत नसल्याने तो बाहेर पडू शकला नाही.
दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान तो कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ महिला व बाल रूग्णालयात भरती केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.