शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 23:54 IST2026-02-06T23:54:29+5:302026-02-06T23:54:48+5:30

चकमकीदरम्यान माओवाद्यांशी मुकाबला करताना जवान दीपक मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने भामरागड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली.

Chief Minister announces assistance of Rs 2.25 crore to the family of martyred jawan Deepak Madavi | शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

गडचिरोली :  भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना वीरमरण प्राप्त झालेले सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाजमाध्यमांवर भावना व्यक्त केल्या.

या मोहिमेत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांच्या शौर्याचे कौतुक करतानाच, मुख्यमंत्र्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला २.२५ कोटी रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केली.
‎​
‎गेल्या ३ दिवसांपासून गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे. सी-६० पथकाच्या बहाद्दर जवानांनी प्राणांची बाजी लावत नक्षलवाद्यांचे २ मोठे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत ७ माओवाद्यांचे मृतदेह आणि ५ अत्याधुनिक अग्निशस्त्रे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले .

‎दीपक मडावी यांचे योगदान महाराष्ट्र विसरणार नाही!

या चकमकीदरम्यान माओवाद्यांशी मुकाबला करताना जवान दीपक मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने भामरागड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी दीपक मडावी यांनी दिलेली सर्वोच्च आहुती महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

Web Title : शहीद जवान दीपक मडावी के परिवार को ₹2.25 करोड़ की सहायता

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने गढ़चिरोली में नक्सलियों से लड़ते हुए शहीद हुए जवान दीपक मडावी के परिवार को ₹2.25 करोड़ की सहायता और नौकरी की घोषणा की। सरकार ने नक्सलवाद को खत्म करने का संकल्प लिया।

Web Title : Martyred Jawan Deepak Madavi's Family Receives ₹2.25 Crore Aid

Web Summary : Maharashtra government announces ₹2.25 crore aid and job for family of Deepak Madavi, a jawan martyred fighting Naxalites in Gadchiroli. The government vows to eradicate Naxalism and remembers Madavi's sacrifice for the nation.