शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी कुलगुरू मिळाले; विद्यापीठाच्या समित्या कधी होणार स्थापन?

By admin | Updated: October 18, 2014 23:25 IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यापीठाला लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा राज्य शासनाने

गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यापीठाला लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या नाही. तसेच विद्यापीठाच्या प्रशासकीय कामासाठी आवश्यक असलेल्या विविध समित्यांचे गठणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा कारभार अधांतरी झाला. गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित रूजू झाले आहे. आता या विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांच्या गठणाचा मुहूर्त कधी निघतो, याची शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना प्रतीक्षा आहे.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने गडचिरोली येथे २००९ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. २ आॅक्टोबर २०११ पासून गोंडवाना विद्यापीठाचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाला. गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होण्याचा मान डॉ. विजय आर्इंचवार यांना मिळाला. आर्इंचवार यांच्या काळात गोंडवाना विद्यापीठाची सुरूवात झाली. या विद्यापीठांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील २५० च्या आसपास महाविद्यालय येतात. नवीनच सुरूवात करतांना नोकरी भरती, खरेदी आदी प्रकरणामुळे कुलगुरू व कुलसचिव दोघांच्या कारभारामुळे विद्यापीठाची मोठी चर्चा समाजात होत राहीली. या प्रकरणीही अनेक तक्रारीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही दाखल झाल्यात. गोंडवाना विद्यापीठाने नवीनच वाटचाल करताना ४५ दिवसात परीक्षांचे निकाल लावून विक्रमही केला. मात्र गोंडवाना विद्यापीठाचा कारभार कुलगुरूंच्याच ताब्यात एकवटलेला दिसत होता. दोन ते अडीच वर्षाच्या काळात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समित्याही राज्यशासनाने गठीत केल्या नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागात या फाईली दाबून ठेवण्यात आल्या. प्राचार्य फोरमने विद्यापीठाच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकल्यावरही शासनाने मात्र कोणतीही कार्यवाही केली नाही. आता निवडणुकीच्या काळात गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांची निवड केली आहे. विद्यापीठाचा लौकिक कायम ठेवण्यासोबतच नक्षलग्रस्त भागातील या विद्यापीठात असणाऱ्या महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जाही उंचाविण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. तसेच राज्यशासनाकडे प्रलंबित असलेला विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांच्या गठणाचा प्रस्ताव शासन कोणत्या मुहूर्तावर मार्गी लावतो, याची प्रतीक्षा या समित्यांवर नाव असणाऱ्यांनाही लागली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे आता अनेकांचे लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी)