शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

वणवा थांबविण्याचे वन विभागासमोर आव्हान

By admin | Updated: March 10, 2017 02:18 IST

मार्च महिना सुरू होताच जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी पावसाळ्यानंतर केवळ ७ मार्च रोजी थोडाफार अवकाळी पाऊस झाला

कोट्यवधींचा खर्च : घनदाट जंगलामुळे आगीची शक्यता अधिकवैरागड : मार्च महिना सुरू होताच जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी पावसाळ्यानंतर केवळ ७ मार्च रोजी थोडाफार अवकाळी पाऊस झाला. काही तालुक्यांमध्ये तर पाऊसही पडला नाही. त्यामुळे जंगलातील गवत पूर्णपणे वाळून आहे. थोडीशीही ठिणगी पडताच त्याला वनव्याचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी वनवे थांबविणे हे वन विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभापासून पूर्व विदर्भातील पानझडीच्या जंगलांना आगी लागण्याचे प्रकार घडतात. आगी लागू नये म्हणून वन विभागाच्या मार्फतीने फायरलाईन जाळली जाते. मात्र सदर उपाययोजना केवळ देखावा असल्याचे आजपर्यंत निष्पन्न झाले आहे. याबाबीवर मोठ्या प्रमाणात वन विभाग पर्यायाने शासनाचा पैसा खर्च होतो. मार्चपासून मोहफुलाचा हंगाम सुरू होते. मोहफूल विकणारे लोक झाडाखालील जागा साफ असावी, यासाठी पालापाचोळा गोळा करतात आणि त्याची ठिकाणी पालापाचोळा जाळून टाकतात. ही आग पसरत जाऊन वनव्याचे रूप धारण करते. वनवे लागण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील गवत जाळतात. आग लावल्यानंतर आग विझविणे ही संबंधित शेतकऱ्याची जबाबदारी आहे. मात्र शेतकरी आग न विझविताच घराकडे परतात. त्यामुळे आग संपूर्ण जंगलात पसरते व आगीमुळे जंगलाचे मोठे नुकसान होते. या सर्व बाबी टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. मात्र जनजागृतीचे काम वन विभागाच्या मार्फतीने पाहिजे त्या प्रमाणात केले जात नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दाट जंगल आहे. त्यामुळे वनव्यांची समस्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अत्यंत तोकड्या असल्याचे दिसून येत आहे. वनव्याने रौद्ररूप धारण केल्यानंतर या वनव्यात दरवर्षी कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. त्यामुळे वन विभागाने आग थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)