शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींसमोर विकासाचे आव्हान

By admin | Updated: September 16, 2014 23:44 IST

पंचायत समितीच्या सभापतिपदी शशिबाई बंडू चिळंगे तर उपसभापतीपदी केशव मसा भांडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त सभापती व उपसभापती दोघेही स्वच्छ प्रतिमेचे मानले जातात.

लोमेश बुरांडे - चामोर्शीपंचायत समितीच्या सभापतिपदी शशिबाई बंडू चिळंगे तर उपसभापतीपदी केशव मसा भांडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त सभापती व उपसभापती दोघेही स्वच्छ प्रतिमेचे मानले जातात. पंचायत समितीमध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्या सोडवून विकासकामे करण्याचे आव्हान सभापती व उपसभापतींना पेलावे लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून चामोर्शीची ओळख आहे. या तालुक्यात १८६ गावे असून ७६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६५ हजार ५१४ एवढी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुके ज्याप्रमाणे विकासापासून वंचित आहेत. त्याला चामोर्शी तालुकासुद्धा अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील बहुतांश गावांपर्यंत अजूनही आरोग्य, शिक्षण, रस्ते, विद्युत, सिंचन, कृषी आदी सुविधा पोहोचल्या नाहीत. शासन व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचारी मानत नाही. तालुक्यातील जवळपास ९० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वेळेवर काम होत नाही. आलेल्या नागरिकांना परत जावे लागते. अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी हा वादाचा मुद्दा बनला आहे. नवनिर्वाचित सभापती शशिबाई चिळंगे व उपसभापती केशव भांडेकर हे दोघेही स्वच्छ प्रतिमा असलेले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. याच बळावर त्यांची अविरोध निवड करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणत प्रशासनात गतिमानता आणण्याचे मोठे आव्हान सभापती व उपसभापतींसमोर आहे. अडेलतट्टू धोरणामुळे नागरिकांच्या मनात अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांचे कधीच एका दिवशी काम होत नाही. हे प्रशासनाचे धोरणच बनले आहे. ही सवय बंद करावी लागणार आहे. विकास कामांचे योग्य नियोजन करून ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचतील यासाठी विशेष प्रयत्न करावा लागणार आहे. एकंदरीतच सभापती व उपसभापती पदाचा मुकूट मिळाला असला तरी सदर मुकूट काटेरी आहे. हे सुद्धा नाकारता येत नाही. जनता व पं. स. सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासास पात्र ठरावे लागणार आहे.