शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

-तर चक्काजाम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:12 AM

एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देभामरागडच्या समस्या सोडवा : एसडीएममार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. शासनस्तरावर अनेकदा मागणी करूनही तालुक्यातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या ६ सप्टेंबरपर्यंत विविध मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांच्या वतीने देण्यात आला.एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा शासनाविरूद्ध आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच निषेध म्हणून येथील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. नायब तहसीलदार निखील सोनवने यांना निवेदन देताना त्रिवेणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष महेश कोंकमुट्टीवार, सचिव राजेंद्र कोठारे उपस्थित होते.या आहेत प्रमुख मागण्याअहेरी उपविभागाच्या विकासासाठी अहेरी जिल्ह्याची निर्मिती करणे, पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम सुरू करणे, भामरागड न.पं.अंतर्गत सर्वांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करणे, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आलापल्लीवरून टॉवर लाईन टाकणे, वीज दर कमी करणे, बीएसएनएलची फोर-जी सेवा सुरू करून फ्रिक्वेंसी वाढविणे, आठवडी बाजारासाठी नवीन जागा देणे. बसस्थानक उभारणे यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम