विजेच्या धक्क्याने पशुपालक ठार : आंधळी येथील घटना
By दिगांबर जवादे | Updated: April 30, 2024 18:08 IST2024-04-30T18:02:09+5:302024-04-30T18:08:12+5:30
Gadchiroli : शेळ्यांसाठी चारा शोधण्यासाठी झाडावर चढले असता विजेचा धक्का लागून मृत्यू

Cattle farmer dies by electric shock
गडचिराेली : शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या ताेडत असताना झाडाजवळून गेलेल्या वीज तारांना पशुपालकाचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का लागला. यात ताे जमिनीवर काेसळून जागीच ठार झाल्याची घटना ३० एप्रिल राेजी सकाळी १०:३० वाजता कुरखेडा तालुक्यातील आंधळी येथे घडली.
तुलाराम मुखरू राऊत (४४) रा. वाघेडा असे मृतकाचे नाव आहे. तुलाराम हा कामानिमित्त कुरखेडा-देसाईगंज मार्गालगत असलेल्या आंधळी फाटा येथे आला होता. शेळ्यांना चार नेण्यासाठी ताे रस्त्यालगत असलेल्या उमरीच्या झाडावर चढून फांद्या ताेडत हाेता. मात्र येथे त्याला जोरदार विजेचा धक्का बसल्याने ताे खाली कोसळत जागीच त्याचा मृत्यू झाला. झाडाच्यावरून ११ केव्हीचे विद्युत वाहिनीचे तार गेले आहेत. फांद्या ताेडत असताना तुलारामचा वीज तारेला स्पर्श झाला असावा, त्यामुळे त्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. मृतक हा आचारीचे काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार अविवाहित मुली, आई-वडील असा परिवार आहे.