गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातला तलाव फुटण्याच्या स्थितीत; गावकरी चिंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:03 IST2019-09-10T16:03:11+5:302019-09-10T16:03:43+5:30
एटापल्ली तालुक्यापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या चंदनवेली या गावातील तलाव फुटण्याच्या परिस्थितीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातला तलाव फुटण्याच्या स्थितीत; गावकरी चिंतीत
ठळक मुद्देदुरुस्तीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या चंदनवेली या गावातील तलाव फुटण्याच्या परिस्थितीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले होते. अनेक ठिकाणी पूर आले होते. या तलावातही पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर असून, तलावाच्या काठची एका बाजूची माती वाहून गेल्याने तिथे मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा वाढत जाऊन तलाव फुटण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे. २९१८ मध्य या तलावाची दुरुस्तीही करण्यात आली होती. मात्र ती नीट झाली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.