जिल्ह्यात काेराेना वाढला, मात्र सॅनिटायझरची विक्री घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:30+5:302021-03-16T04:36:30+5:30
गडचिराेली : गेल्या १५ दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांकडून काेविडचे नियम काटेकाेरपणे पाळले जात नसल्याने रुग्णसंख्या ...

जिल्ह्यात काेराेना वाढला, मात्र सॅनिटायझरची विक्री घटली
गडचिराेली : गेल्या १५ दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांकडून काेविडचे नियम काटेकाेरपणे पाळले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. जिल्हाभरात सध्या सॅनिटायझरची विक्री ७० टक्क्यांनी घटल्याची माहिती औषधी विक्रेत्यांकडून मिळाली.
काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आराेग्य विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांमध्ये काेराेनाची भीती असल्याने सॅनिटायझरचा वापर माेठ्या प्रमाणात केला जात हाेता. मात्र, आता काेराेनावर लस आल्यापासून तसेच अनलाॅक झाल्यापासून शहरी व ग्रामीण भागातील नागरिक काेराेनाबाबत बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे.
काेराेनाचा संसर्ग सुरू झाल्यावर मार्च ते मे २०२० दरम्यान सॅनिटायझरची विक्री बऱ्यापैकी हाेती. त्यानंतर जून, जुलै महिन्यांतही नागरिकांनी सॅनिटायझरची खरेदी केली. थंडीचे दिवस असल्याने काेराेनाची लागण हाेण्यास वातावरण पाेषक असल्याचे पाहून ऑगस्ट ते नाेव्हेंबर महिन्यांत बहुतांश नागरिकांनी औषधी दुकानांतून सॅनिटायझरची खरेदी केली. आता सॅनिटायझरच्या विक्रीत बरीच घट झाली आहे.
काेट...
काेराेना संसर्गाच्या महामारीने महाराष्ट्रासह देश व संपूर्ण जगाला हादरून साेडले आहे. केंद्र व राज्य सरकारने वेळीच आवश्यक त्या उपाययाेजना केल्यामुळे तसेच आराेग्य विभागाच्या प्रयत्नामुळे गडचिराेली जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यात काहीसे यश आले आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा काेराेनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. नागरिकांनी मास्कसह सॅनिटायझरचा नियमित वापर करावा.
- अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असाेसिएशन, गडचिराेली
काेट...
काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कसाेबतच सॅनिटायझरचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिक बिनधास्त झाल्याने सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. आमच्या घरी काेराेनाच्या सुरुवातीपासून सॅनिटायझरचा नियमित वापर केला जात आहे. बाहेरील कामे आटाेपून घरी गेल्यावर आम्ही सॅनिटायझरने हात धुताे. त्यानंतरच पाणी व चहा वगैरे पिताे.
- राकेश बारसागडे, नागरिक
काेट...
काेराेनाचा संसर्ग सुरू झाल्यावर मार्च ते नाेव्हेंबर महिन्यांपर्यंत आमच्या घरी नियमित सॅनिटायझरचा वापर केला जात हाेता. मात्र, गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. आमच्या घरी सॅनिटायझरची बाॅटल उपलब्ध आहे. मात्र, माझ्यासह माझे कुटुंबीय आधीसारखा जास्त वापर करीत नाही. मात्र, मास्कशिवाय आम्ही घराबाहेर पडत नाही. प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
- संदीप मानकर, नागरिक
बाॅक्स...
शाळास्तरावर सुरू आहे वापर
-जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येे इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहे. काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळास्तरावर सॅनिटायझरचा वापर नियमित केला जात आहे. शाळा व महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर हॅण्डवाॅश स्टेशन तयार करण्यात आले असून सॅनिटायझरने विद्यार्थी हात स्वच्छ करीत आहेत.
-जिल्ह्यात विविध विभागांची शासकीय कार्यालये आहेत. तसेच काही निमशासकीय कार्यालये आहेत. काेराेनाच्या सुरुवातीला या सर्व कार्यालयांत सॅनिटायझरचा नियमित वापर केला जात हाेता. मात्र, आता अर्ध्या कार्यालयांतून सॅनिटायझरच्या बाटल्या गायब झाल्या आहेत.
-ग्रामीण भागात माेठी लाेकसंख्या आहे. मात्र, आता बाजारपेठा सुरू झाल्या असून दैनंदिन कामे केली जात आहेत. ग्रामीण भागात काही सुज्ञ नागरिक मास्कचा नियमित वापर करीत आहेत. मात्र, बहुतांश घरी सॅनिटायझर उपलब्ध नसून त्याचा वापर केला जात नसल्याचे दिसून येते. एकूणच सॅनिटायझरचा वापर प्रचंड कमी झाला आहे.
-हिवाळ्यात लहान मुले व वृद्ध नागरिकांकडून सॅनिटायझर तसेच साबणांचा वापर वेळाेवेळी केला जात हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या टप्प्यात या घटकाकडून सॅनिटायझर व साबणाचा वापर कमी झाला आहे.