शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

काेरानामुळे वर्षभरात बेराेजगारीत पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 5:00 AM

गडचिराेली जिल्ह्यात एकही माेठा उद्याेग नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यात शेती व शेतीवर आधारीत दुसरा काेणताच राेजगार उपलब्ध नाही. यातून मार्ग काढत काही युवक नागपूर, पुणे, मुंबई किंवा दुसऱ्या राज्यातील कंपन्यांमध्ये मिळेल ते काम करीत हाेते. वेतन जरी कमी मिळत असले तरी राेजगाराची समस्या सुटली हाेती. मात्र काेराेनाच्या कालावधीत शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. या कालावधीत कंपन्या बंद ठेवण्यात आल्याने हा वर्ग गावाकडे परत आला.

ठळक मुद्देपुणे-मुंबईवरून परतले युवक, नववर्षात स्वयंरोजगाराला मिळू शकते चालना

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे अनेक उद्याेगांचे कंबरडे माेडले. लाॅकडाऊनमुळे अनेक उद्याेग बंद पडले. पुणे, मुंबई, नागपूर व इतर माेठ्या शहरांमध्ये राेजगारासाठी गेलेले युवक काेराेनामुळे परत आले. आता हे युवक बेराेजगारीचा सामना करीत आहेत. जिल्ह्यात शेती आणि मर्यादित असलेल्या खासगी नोकरीवर आता त्यांना वेळ मारून न्यावी लागत आहे. गडचिराेली जिल्ह्यात एकही माेठा उद्याेग नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यात शेती व शेतीवर आधारीत दुसरा काेणताच राेजगार उपलब्ध नाही. यातून मार्ग काढत काही युवक नागपूर, पुणे, मुंबई किंवा दुसऱ्या राज्यातील कंपन्यांमध्ये मिळेल ते काम करीत हाेते. वेतन जरी कमी मिळत असले तरी राेजगाराची समस्या सुटली हाेती. मात्र काेराेनाच्या कालावधीत शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. या कालावधीत कंपन्या बंद ठेवण्यात आल्याने हा वर्ग गावाकडे परत आला. काेराेनातून सावरत अनेक कंपन्या सुरू झाल्या. मात्र पाहिजे तेवढी उलाढाल हाेत नसल्याची परिस्थिती आजही कायम आहे. त्यामुळे परत आलेले युवक पुन्हा कामावर जाण्यासाठी तयार नाहीत. त्यांना आता बेराेजगारीचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी आपला पारंपारीक व्यवसाय सुरू केला आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक नागरिक शेतीत काम करीत असल्याने छुप्या बेराेजगारीचे प्रमाण वाढले आहे. २०२०  हे वर्ष सर्वाधिक बेराेजगारी निर्माण करणारे वर्ष ठरले आहे. स्थानिक स्तरावरील आर्थिक ताळमेळ बिघडला असल्याने अनेक उद्याेजकांनी मजूर कपातीचे धाेरण स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्यांनाही काही प्रमाणात बेराेजगारीचा सामना करावा लागत आहे. येणाऱ्या नवीन वर्षात स्वयंरोजगार उभारण्यास चालना देऊन चांगले मार्गदर्शन मिळाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते.

उद्याेग स्थापनेचा मुहूर्त वर्षभर पुढे ढकललागडचिराेली जिल्ह्यात माेठा उद्याेग नसला तरी अनेक लहान उद्याेग आहेत. यातूनच बऱ्यापैकी राेजगार उपलब्ध हाेतो. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देऊन बाजारपेठ खुली झाली असली तरी अजुनही बाजारपेठेत पूर्वीएवढा उत्साह नाही. त्यामुळे बाजारपेठेत उलाढाल नाही. नवीन उद्याेग टाकताना प्रस्थापित उद्याेजकांसाेबत स्पर्धा करावी लागते. ती हिम्मत कोरोनाने हिरावली आहे. त्यामुळे नवीन उद्याेजक स्पर्धा करू शकत नसल्याने अनेकांनी उद्याेग स्थापनेचा मुहूर्त किमान वर्षभर पुढे ढकलला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी