शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात गांजाची शेती उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:35 IST

कुरखेडापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी शेतशिवारात प्रतिबंधित असलेल्या गांजा या अमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहीती कुरखेडाचे ठाणेदार सुधाकर देठे यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेखर आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात छापा मारण्यात आला.

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : येथून वाकडी मार्गावरील एका शेतात चक्क गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्या शेतात छापा मारून केलेल्या कारवाईत तब्बल ५२ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. कुरखेडापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी शेतशिवारात प्रतिबंधित असलेल्या गांजा या अमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहीती कुरखेडाचे ठाणेदार सुधाकर देठे यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेखर आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात छापा मारण्यात आला. यावेळी कुंडलिक मुंगसू कसारे (६५) रा.आझाद वार्ड, कुरखेडा यांच्या शेतात हिरवट आणि उग्र वास येणाऱ्या गांजा या वनस्पतीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केली असल्याचे दिसून आले. याचवेळी तो गांजा विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी आलेले सौरव संतोष डहाळे (२०) आणि रितिक राधेश्याम मच्छिरके (रा.चिखली, ता.कुरखेडा) हे सुद्धा तिथे होते. या तिन्ही आरोपींकडून ५२ किलो ९०० ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. त्याची बाजारभावानुसार किंमत २ लाख ६४ हजार ५०० रुपये आहे. तसेच आरोपीकडील एक दुचाकी (किंमत २५ हजार) जप्त करण्यात आली.तीनही आरोपींविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस)१९८५ चे कलम ८(क)(२०) ब, क, २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी कुरखेडाचे न्यायालय कोरचीत जात असल्यामुळे सदर आरोपींना कोरचीला नेऊन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यात तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.ही कारवाई ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, हवालदार बळीराम पदा, मनोहर पुराम, मानकर, बारसागडे, पोलीस शिपाई व कर्मचाऱ्यांनी केली.

 

अलिकडची पहिलीच कारवाईजिल्ह्याच्या काही भागात छुप्या मार्गाने तेलंगणाकडून गांजा येतो, पण जिल्ह्यात गांजाची शेती करण्याची हिंमत अलिकडे कोणी केलेली नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीने शेतातून हिरवा गांजा जप्त करण्याची ही अलिकडच्या काही वर्षातील पहिलीच कारवाई ठरली आहे. हा गांजा नेमका कोणाला विक्री केला जात होता, त्यांचे जाळे कुठे-कुठे पसरले आहे हे पुढील तपासात सत्य उजेडात येऊ शकते. विदर्भाच्या काही जिल्ह्यात दुर्गम भागात गांजाची शेती केली जाण्याची शक्यता आहे. मात्र याची माहिती अजून मिळाली नाही.

 

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारी