शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

By admin | Updated: July 4, 2015 02:25 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे, ...

पालकमंत्र्यांना साकडे : शिवसेना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व केंद्र प्रमुख संघटनेचे निवेदनगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. नरड यांचा कार्यकाळ पूर्ण न होताच त्यांची लातूर येथे बदली करण्यात आली. जिल्ह्यातीलच रहिवासी असल्याने त्यांनी या भागातील शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न केलेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी जि.प. बांधकाम सभापती छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, राजू कावळे, वासुदेव शेडमाके, विजय श्रुंगारपवार, जि.प. सदस्य सुनंदा आतला, नरेंद्र कुमरे, संतोष मारगोनवार आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन शिक्षणाधिकारी नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रांतीय अध्यक्ष शेमदेव चापले, जिल्हाकार्यवाह अजय लोंढे, सहकार्यवाह सुरेंद्र मामीडवार, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र भोयर आदी उपस्थित होते. केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीनेही शिक्षणाधिकारी नरड यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होईल, असे महाराष्ट्र प्रदेश केंद्र प्रमुख संघ गडचिरोलीचे अध्यक्ष गौतम मेश्राम, सरचिटणीस दिलीप मुपीडवार, कार्याध्यक्ष बोरकर, उपाध्यक्ष ताराम, महिला उपाध्यक्ष लता चौधरी यांनी म्हटले आहे. बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)