शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बायपास रस्ता वाहतूकदारांसाठी ठरत आहे धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:24 IST

देसाईगंज येथील भूमिगत पुलाच्या अप्रोच मार्गांवरून केवळ दुचाकी, ट्रॅक्टर, कार, चारचाकी वाहनेच आवागमन करू ...

देसाईगंज येथील भूमिगत पुलाच्या अप्रोच मार्गांवरून केवळ दुचाकी, ट्रॅक्टर, कार, चारचाकी वाहनेच आवागमन करू शकत असल्याने व रेल्वे पुलाची उंची फक्त ३.६० मीटरच असल्याने मालवाहतूक वाहने बायपास मार्गाने वळविण्यावाचून पर्याय नाही. मात्र, या मार्गाची झालेली दुरवस्था पाहून जड वाहतूकदारांसाठी डोकेदुखी आहे.

विशेष म्हणजे, रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वेळोवेळी रेल्वे फाटक बंद करण्यात येत असल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होताे. अवजड वाहने उभी ठेवावी लागतात. त्यातही तीन किलोमीटर अधिकचा फेरा मारून वाहतूक करावी लागते. हा मार्ग अद्यापही दुर्लक्षित असून बांधकामाचे भिजत घोंगडे कायम असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जड वाहतुकीच्या सोयीसाठी तातडीने या रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी अवजड वाहनधारकांनी केली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढती वाहतूक व पावसाळ्यात होणारी पर्यायी मार्गाची दुरवस्था लक्षात घेता शहरात फ्लाॅयओव्हर निर्माण करण्याची गरज नागरिक बाेलून दाखवित आहेत.

बाॅक्स

राष्ट्रीय महामार्ग कुठून जाणार?

सिरोंचा-आष्टी-चामोर्शी- गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज- साकोली या राज्यमार्ग ३५३ सी.चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ राेजी तांत्रिक निविदाही काढण्यात आली. नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गासाठी १६२.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन हे काम तीन महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र, हे काम अद्यापही संथगतीनेच सुरू होऊन सद्य:स्थितीत काम बंदच असल्याने हा मार्ग शहराच्या जुन्याच मार्गाने जाणार की बायपासने, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.