शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
2
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
3
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
4
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
5
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
6
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
7
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
8
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
9
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
10
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
11
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
12
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
13
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
15
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
16
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
17
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
18
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
19
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
20
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी-देचलीपेठा मार्गावरील बसफेरी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा गावात जाण्यासाठी अहेरी डेपोची बस मागील अनेक वर्षांपासून सुरू हाेती. परंतु ...

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा गावात जाण्यासाठी अहेरी डेपोची बस मागील अनेक वर्षांपासून सुरू हाेती. परंतु काेरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळाने दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या बसफेऱ्या पूर्णपणे बंद केल्या. मध्यंतरी जिमलगट्टापासून ५ किमी अंतरावरील किष्टापूर गावालगतच्या नाल्यावरील रपटा पावसाळ्यात वाहून गेल्याने बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. मात्र आता शासनाने या नाल्यावर पुलाचे बांधकाम केले आहे. या मार्गावरून कोणत्याही प्रकारची वाहने सहज जाऊ शकतात. देचलीपेठा ह्या गावातील नागरिकांना दररोज विविध कामांसाठी अहेरी तालुका मुख्यालयात जावे लागते. नागरिकांना काम आटोपून परत गावी येण्यास कोणत्याही प्रकारचे साधन नसल्यामुळे त्यांना अहेरी तालुका मुख्यालयापासून जिमलगट्टापर्यंत यावे लागते. येथील नागरिकांना नेहमीच खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागताे. मात्र अनेक खासगी प्रवासी वाहनधारक मनमानीपणे प्रवासभाडे आकारतात. तसेच वाहनाच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर छत्री घेऊन टपावर बसून प्रवास करावा लागताे. येथील नागरिकांनी वेळोवेळी अहेरी आगार प्रमुखांची भेट घेऊन बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.परंतु आगर प्रमुखांनी देचलीपेठामार्गे बसफेरी पूर्ववत सुरू केली नाही. नागरिकांमध्ये आगार प्रशासनाविषयी राेष व्यक्त हाेत आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या साेयीसाठी देचलीपेठामार्गे बसफेरी लवकर सुरू करावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

बाॅक्स

मिळेल त्या वाहनाने प्रवास

जिमलगट्टा-देचलीपेठा परिसरात १५ ते २० गावांचा समावेश आहे. या भागातील नागरिकांनी वैयक्तिक खासगी तसेच कार्यालयीन कामाकरिता तालुका मुख्यालयात जावे लागते. परंतु नागरिकांना ये-जा करण्यासाठी काेणत्याही प्रकारचे साधन नाही. बसफेरी सुरू असताना नागरिकांना अडचणी येत नव्हत्या. परंतु बसफेरी बंद झाल्यापासून आवागमनासाठी अडचणी येत आहेत.ज्या नागरिकांकडे वाहने आहेत अशा नागरिकांना अडचणी नाहीत. परंतु ज्यांच्याकडे साधने नाहीत अशांना दुसऱ्यांकडील वाहनांचा आधार घ्यावा लागताे. मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करीत तालुका मुख्यालयात यावे लागते.