शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

बंडीला जुंपलेली बैलजोडी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:38 PM

जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलांचा स्पर्श होऊन बंडीला जुंपलेली बैलजोडी जागेवरच ठार झाली. प्रसंगावधान राखत शेतकरी व त्याची आई बैलबंडीवरून उतरल्याने ते सुखरूप आहेत.

ठळक मुद्देजिवंत वीज तारांना स्पर्श । मोहटोला शेतशिवारातील घटना; अचानक सुरू झाला होता वीज प्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलांचा स्पर्श होऊन बंडीला जुंपलेली बैलजोडी जागेवरच ठार झाली. प्रसंगावधान राखत शेतकरी व त्याची आई बैलबंडीवरून उतरल्याने ते सुखरूप आहेत. सदर घटना देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) गावात शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.मोहटोला येथील शेतकरी योगाजी दिनाजी दोनाडकर (३२) व त्यांची आई पार्वताबाई दिनाजी दोनाडकर (६०) हे दोघे बैलबंडीने शेतावर जात होते. जुना किन्हाळा या गावची मुख्य विद्युत लाईन या भागातून गेली आहे.किन्हाळा गाव पुनर्वसित झाल्यापासून तेथील प्रवाह बंद करण्यात आला होता. या तारा जमिनीवर पडल्या होत्या. याच भागातून नव्याने विद्युत पंपासाठी वीज तारा टाकण्यात आल्या आहेत. चालू व बंद असलेल्या दोन्ही वीज तारा एकमेकांना ओलांडून गेल्या आहेत. मृत तारांचे खांब कालपरत्वे. जमिनीकडे कलत आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या रात्री मृत तारांचा स्पर्श जीवंत तारांना झाला. त्यामुळेमृत तारांना वीज प्रवाह सुरू झाला. याच तारांना दोन्ही बैलांचा स्पर्श होऊन बैलबंडीला जुपलेल्या स्थितीतच दोन्ही बैल ठार झाले. संबंधित शेतकऱ्याचे जवळपास ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.संबंधित शेतकºयाची बैलबंडी लोखंडी आहे. मात्र बैलांच्या मानेवर ठेवलला जू हा लाकडी असल्याने बैलांना लागलेला वीज प्रवाह बंडीपर्यंत प्रवाहित झाला नाही. त्यामुळे बंडीवर बसलेल्या शेतकºयाला विजेचा धक्का लागला नाही.या परिसरातील अनेक वीज खांब जमिनीकडे झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे भविष्यातही या वीज तारांपासून धोका आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षनिकामी झालेल्या तारा उचलण्यात याव्या, अशी मागणी शेतकºयांनी महावितरणच्या गाव पातळीवरील लाईनमनकडे केली होती. मात्र संबंधित लाईनमनने याकडे दुर्लक्ष केल्याने एवढा मोठा अनर्थ घडला. त्या तारांना वीज पुरवठा सुरू नसल्याने काहीच होणार नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती संबंधित लाईनमन देत होता. त्या लाईनमनच्या वेतनातून बैल जोडीची रक्कम वसूल करून संबंधित शेतकºयाला महावितरणने ताबडतोब द्यावी. त्याचबरोबर संबंधित लाईनमनला निलंबित करावे, अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन केला जाईल, असा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :electricityवीज