लाेहा व येडसिली येथे पक्क्या रस्त्याचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:34+5:302021-05-11T04:38:34+5:30

गावात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे येथे पक्क्या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोहा गावाचा समावेश ...

Build paved roads at Laha and Yedsili | लाेहा व येडसिली येथे पक्क्या रस्त्याचे बांधकाम करा

लाेहा व येडसिली येथे पक्क्या रस्त्याचे बांधकाम करा

गावात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे येथे पक्क्या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोहा गावाचा समावेश अहेरी तालुक्यात आहे, तर येडसिली गाव सिरोंचा तालुक्यात येते. दोन्ही गावे झिंगानूर परिसरात आहेत; परंतु या गावांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. भारत स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही गावाच्या विकासाला गती मिळालेली नाही. लोहा गावात १०० टक्के आदिवासी समाज आहे; परंतु येथे अद्यापही साेयीसुविधा पोहोचल्या नाहीत. गावातील नागरिकांना नियमित आरोग्य सेवा मिळत नाही. गावातील नागरिक शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येते. येथे पक्के रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. लोहा गावात जुन्या काळातील एक विहीर आहे. १९८३ मध्ये या गावात एक हातपंप बसविण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये बोअरवेल खोदकाम करण्यात आले. परंतु या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही.

Web Title: Build paved roads at Laha and Yedsili