शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भावाने तलवारीने सपासप वार करत केली बहिणीची हत्या ! आई जीव वाचवण्यासाठी घुसली शेजाऱ्याच्या घरात; चंद्रपुरातील रक्तरंजित घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:40 IST

Chandrapur : घरगुती वादातून भद्रावतीत रक्तरंजित घटना; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (चंद्रपूर) : शहरातील झिंगुजी वॉर्ड परिसरात घरगुती वादाने रौद्ररूप धारण करीत सख्ख्या भावाने बहिणीची तलवारीने हत्या केली, तर आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२४ फेब्रुवारी) रात्री सुमारे ०८:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत संजीवनी शंकर भोंडे (३०) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई पुष्पा शंकर भोंडे (५५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सूरज शंकर भोंडे (२८) याने घरातील तलवारीने बहिणीच्या मानेवर सपासप वार करून तिची निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर आईचा पाठलाग करीत तिच्या कानावर व हातावर वार केले. जखमी अवस्थेत पुष्पा भोंडे यांनी शेजाऱ्यांच्या घरात धाव घेतल्याने त्यांचा प्राण वाचला. कौटुंबिक कारणांवरून गेल्या काही दिवसांपासून घरात वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. आरोपी सूरज व त्याचे वडील शंकर हे वेगळा स्वयंपाक करीत होते, तर माय-लेकी वेगळा स्वयंपाक करीत होत्या. जेवणाच्या कारणावरून आणि घरगुती कामांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. माय-लेकी शेतमजुरीस जात असल्यामुळेही तणाव वाढत होता.

घटनेच्या दिवशी काय घडले?

घटनेच्या दिवशी सूरज भोंडे हा बाजारातून भाजीपाला घेऊन आला असता तो बहिणीने हिसकावून घेतला. या कारणावरून वाद चिघळला. संतापाच्या भरात सूरजने तलवार उचलून बहिणीवर जीवघेणे वार केले.

या वादासंदर्भात यापूर्वीही पोलिसांत तक्रारी झाल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या रक्तरंजित घटनेची शहरभर चर्चा सुरू असून झिंगुजी वॉर्ड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brother Murders Sister with Sword in Chandrapur; Mother Injured.

Web Summary : A brother in Chandrapur fatally attacked his sister with a sword following a domestic dispute. The mother was also injured while trying to intervene. Family quarrels over meals and work were reportedly the cause.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी