शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मेडीगड्डा धरणावरील पूल खचला, दरवाजे उघडल्याने २० गावांतील शेतकऱ्यांना फटका

By संजय तिपाले | Updated: October 22, 2023 12:31 IST

...त्यामुळे महाराष्ट्रातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

गडचिरोली : महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील पोचमपल्लीनजीक तेलंगणा सरकारच्या कालेश्वरम मेडीगड्डा धरणावरील पुलाचा पाया २१ ऑक्टोबरला रात्री खचल्याने अचानक गोदावरील नदीत विसर्ग केला. त्यामुळे महाराष्ट्रातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

 महाराष्ट्र- तेलंगणा सीमेेवरील मेडीगड्डा धरणाच्या बॅक वॉटरमुळे महाराष्ट्रातील शेकडो एकर शेतीचे नुकसान होते. या धरणाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा विरोध आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबरला रात्री उशिरा अचानक  मेडीगड्डा धरणावरील महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाचे २०,२१ व २२ क्रमांकाचे खांब खचले. त्यामुळे सायरनद्वारे सूचना देऊन दाेन्ही बाजूंनी रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला. त्यानंतर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यत आला.

सिंचन विभागाचे तज्ज्ञ अभियंता व वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत, सध्या युध्दपातळीवर दुरुस्तीकाम सुरु आहे

तथापि, आनक पाणी सोडल्याने आसरअल्ली, सोमनू, संगम, टेकडामोटला अशा १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नदीकाठी सिचंनासाठी विद्युतपंप, पाईप, वायर या पाण्यात वाहून गेले. मिरची, कापूस उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहेे. 

मेडीगड्डा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील लोकांसाठी नुकसानकारक आहे. बॅकवॉटरमुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होते. आता पूल खचल्याने अचानक विसर्ग केल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीन भरपाई द्यावी.  - चंद्रशेखर पुलगम, सामाजिक कार्यकर्ते

मेडीगड्डा धरण तेलंगणाचे अन् नुकसान महाराष्ट्राचे... अशी परिस्थिती आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावेत. सरकारने लोकांचे आयुष्य जोखमीत टाकू नये. परिसरातील सर्व गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन भरपाई तात्काळ द्यावी.- संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते

रात्री पुलाचा ही भाग खचल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने रहदारी बंद केली. तेथे सिंचन विभागाकडून दुरुस्तीकाम सुरु आहे. नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहेे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे.- जितेंद्र शिकतोडे, तहसीलदार सिरोंचा 

टॅग्स :DamधरणWaterपाणीFarmerशेतकरी