बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:59 IST2018-11-10T18:58:59+5:302018-11-10T18:59:04+5:30
लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळून आला आहे.

बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला
सिरोंचा (गडचिरोली) : लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळून आला आहे.
प्रवीण सरय्या कुमरी (१८) रा.कोतापल्ली असे युवकाचे नाव आहे. प्रवीण हा आपल्या मित्रांसोबत गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेला होता. सायंकाळपर्यंत तो परत आला नाही. कुटुंबियांनी त्याच्या मित्रांना विचारणा केली असता, तो नदीत बुडाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता मृतदेह नदीपात्रात आढळून आला. याबाबत आसरअल्ली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.