जिल्हाभरात १७८ जणांचे रक्तदान
By Admin | Updated: September 26, 2015 01:31 IST2015-09-26T01:31:48+5:302015-09-26T01:31:48+5:30
सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिरांचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे.

जिल्हाभरात १७८ जणांचे रक्तदान
गणेश मंडळांचे सामाजिक दायित्व : देसाईगंज, अहेरी, चामोर्शी, मुलचेरा तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त रक्तदान कार्यक्रम
गडचिरोली : सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिरांचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. गुरूवार व शुक्रवारी जिल्ह्यात चामोर्शी, देसाईगंज, अहेरी, मुलचेरा येथे १७८ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.
मुलचेरा : येथे सार्वजनिक गणेश मंडळांनी गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ४८ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार एस़ एऩ पठाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पी़ आऱ ठाकरे, वन परिक्षेत्र अधिकारी मेढेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ ़विजय आकोलकर डॉ़ यशपाल चंदे, डॉ़ वीरेंद्र खांडेकर, डॉ़ भरत काकडे आदी उपस्थित होते. या शिबिरात तीन महिलांसह गणेश बंकावार, दिवाकर पेंदाम, हर्षवर्धन बाळेकरमकर, अविनाश चुने, संजय मोरघडे आदींनी रक्तदान केले. शिबिरासाठी बाळू मडावी, पी़ पी़ चलाख, श्रीकांत चव्हाण, संदीप घोगरे, मनोज तिजारे, सचिन गंगासागर, गजानन गेडाम, व्यंकटेश सुनतकरी, वामन मडावी, गजू पोतराजवार, टिकेश दोनाडे, गणेश कुबडे, बंडू गुरनुले, रवी दुर्गे, स्मिता लोणारे, शशीकला मडावी आदीनी परिश्रम घेतले़
चामोर्शी : येथील श्री गणेश युवा मंडळातर्फे रक्तदान शिबिर शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी आमदार डॉ. देवराव होळी, मांतेश श्रीरामे यांनी सहकार्य केले. ३० युवकांनी यावेळी रक्तदान केले. तसेच याप्रसंगी शुगर, हृदय दाब, सिकलसेल, एचआयव्ही, दंत आदी रोगांच्या रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. नागदेवते, मंडळाचे अध्यक्ष शरद रामटेके, उपाध्यक्ष प्रतीक राणे, सचिव विकास पेंटलवार, अंकुश संतोषवार, अक्षय लांजेवार आदी उपस्थित होते.
देसाईगंज : श्री बालगणेश उत्सव मंडळाच्या वतीने नगर परिषद भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८४ जणांनी रक्तदान केले. यावेळी न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, संतोष शामदासानी, विलास ढोरे, रासेकर गुरूजी, राजू अग्रवाल आदी उपस्थित होते. गडचिरोली येथील डॉ. अमित शेंडे, डॉ. अर्चना गऱ्हाटे, अजय ठाकरे, देशमुख, मैंद, टेकाडे, पंकज निखारे आदींनी शिबिरासाठी सहकार्य केले.
अहेरी : न्यू बाल गणेश मंडळ इंदिरानगर बेघर कॉलनी येथे शुक्रवारी रक्तदान व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १६ जणांनी रक्तदान केले. यात संदीप ठाकरे, राकेश मेश्राम, रामकिशन मडकवार, अजित मोहुर्ले, शंकर दंडीकेवार, राहूल आत्राम, विजय ठाकरे, रोहन शुद्दलवार, आकाश सिडाम, चेतन बिटपल्लीवार, कैलाश चंदनखेडे, मोहमद आरीफ कुरेशी, धीरज तुलशीगिरीवार, प्रवीण मेश्राम, देवानंद मडावी, अजय ठाकरे आदींनी रक्तदान केले. मोहमद आसिफ कुरेशी या मुस्लीम दाम्पत्यांनी मंडळासाठी सहकार्य केले आहे व त्यांनी रक्तदानही केले. शिबिरासाठी डॉ. उमाटे, सरिता वाघ, गोपाल महतो, शरद बांबोळे, मन्ना, शैलेश पटवर्धन, दिलीप मेश्राम, रवी मोहुर्ले, रमेश तुलशीगिरवारी, विनोद मांडवगडे, सुनील हजारे, सूरज तुलशीगिरीवार, हरीश आश्राम, स्वप्नील मेश्राम यांनी सहकार्य केले. यावर्षी जिल्हाभरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान ही लोकचळवळ झाल्याचा प्रत्यंतर येत आहे.