आणीबाणीविराेधात भाजपने पाळला ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:39+5:302021-06-29T04:24:39+5:30

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी, अध्यक्षस्थानी खासदार अशाेक नेते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डाॅ.देवराव ...

BJP observes 'black day' in protest of emergency | आणीबाणीविराेधात भाजपने पाळला ‘काळा दिवस’

आणीबाणीविराेधात भाजपने पाळला ‘काळा दिवस’

Next

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे माजी संघटनमंत्री रवींद्र भुसारी, अध्यक्षस्थानी खासदार अशाेक नेते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डाॅ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, प्रकाश गेडाम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जेष्ठ नेते रमेश भुरसे, योगीता भांडेकर, अनिल पोहनकर, भारत खटी, मुक्तेश्वर काटवे व कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी देशात आणीबाणी लागू करून सत्तेच्या बळावर भय व असुरक्षितता निर्माण करून लोकशाहीची हत्या केली हाेती, असे प्रतिपादन रवींद्र भुसारी यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. सुरुवातीला आणीबाणी काळात मिसाअंतर्गत अटक झालेल्या व सध्या हयात नसलेल्या स्व. नारायण खटी, स्व. श्रीराम लांबे, स्व. मामा मारोडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष वामन तुरके व अन्य पदाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले.

संचालन भाजयुमो कुरखेडा तालुकाध्यक्ष विनोद नागपूरकर तर आभार महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी भाजयुमो प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, मधुकर भांडेकर, सागर कुंभारे, हर्षल गेडाम, आनंद खजांजी, मंगेश रणदिवे, दिलीप मस्के व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

===Photopath===

270621\563327gad_2_27062021_30.jpg

===Caption===

मार्गदर्शन करताना खा. अशाेक नेते, साेबत जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आ. डाॅ. हाेळी, आ. गजबे.

Web Title: BJP observes 'black day' in protest of emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.