शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने केला गड सर

By admin | Updated: May 17, 2014 00:13 IST

गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती राखीव मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, नाग विदर्भ आंदोलन समिती, रिपाइं (आठवले) व युवाशक्ती आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते ..

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती राखीव मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, नाग विदर्भ आंदोलन समिती, रिपाइं (आठवले) व युवाशक्ती आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपा आघाडीचे उमेदवार गडचिरोलीचे काँग्रेस आमदार डॉ. नामदेवराव दल्लुजी उसेंडी यांचा तब्बल २ लाख ३६ हजार ९७0 मतांनी पराभव केला व काँग्रेसकडे असलेला हा मतदार संघ भाजपाने आपल्या कब्ज्यात घेतला.

सकाळी ८ वाजता इंदाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली. पोस्टल मतमोजणीपासूनच आघाडीवर असलेल्या भाजप उमेदवार अशोक नेते यांनी शेवटच्या २६ व्या फेरीपर्यंत मतांची आघाडी कायमच ठेवली. गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चिमूर, ब्रम्हपूरी, आमगाव या सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये अशोक नेते यांनी प्रचंड आघाडी मिळवित काँग्रेस उमेदवाराचे पाणीपत केले.

अशोक नेते यांना ५ लाख ३५ हजार ९८२, काँग्रेस डॉ. नामदेव उसेंडी यांना २ लाख ९९ हजार ११२ तर बसपाचे रामराव नन्नावरे यांना ६६ हजार ९0६, आम आदमी पक्षाचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना ४५ हजार ४५८ मते मिळाली. भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे प्रा. नामदेव कन्नाके यांना २२ हजार ५१२ मते मिळाली. तर बहुजन मुक्ती पार्टीचे दिवाकर पेंदाम यांना ३ हजार ७३0, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना ६ हजार ६0६, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अँड. प्रभाकर दडमल यांना ३ हजार ४२२, समाजवादी पार्टीचे विनोद नन्नावरे यांना ४ हजार २८७, तृणमूल काँग्रेसचे सतीश पेंदाम यांना ८ हजार १५६ तर अपक्ष बाबुराव दांडेकर यांना ६ हजार ४७0 यांना मते मिळाली. अशोक नेते यांना आमगाव विधानसभा क्षेत्रात २६ हजार ६२ मतांची आघाडी मिळाली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४२ हजार ६७७, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ६९ हजार ९, अहेरी विधानसभा क्षेत्रात ४३,६७३, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात ३0,१६७, चिमूर विधानसभा क्षेत्रात २५,0५२ मतांची आघाडी मिळाली. या आघाडीच्या भरवशावर भाजपच्या ऐतिहासीक विजयाचा मार्ग सुकर झाला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. उसेंडी यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)