अनियंत्रीत दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:46 IST2022-01-12T17:10:02+5:302022-01-12T18:46:31+5:30
अनियंत्रीत दुचाकी समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

अनियंत्रीत दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
गडचिरोली : दुचाकी आणि कारच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. ही घटना धानोरा पेंढरी रोडवर पुलकल गावजवळ घडली.
रुपेश रामदास आवळे (३०, रा धानोरा) असे मृतकाचे नाव आहे. रुपेश दुचाकीने पेंढरी येथे आपल्या बहिणीचे घरी राहून तेथील राईसमिल मध्ये काम करीत होता. त्याचे कुटुंब धानोरा येथे असल्याने तो तीळसंक्रातनिमित्त तो दुचाकीने (एम एच ३३ एन ४२६७) धानोरा येथे जाण्यास निघाला. दरम्यान, पुलकल गावाजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी समोरून येणाऱ्या कारला जाऊन धडकली. या घटनेत रुपेशचा जागीच मृत्यू झाला.
रुपेशची दोन लहान मुली बाबा घरी येणार असल्याने व संक्रात सण घरी मिळून साजरी करणार म्हणून खुशीत होते. परंतु वाटेतच अपघात होऊन रुपेश कायमचा निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांवर शोककळा पसरली. या घटनेचा अधिक तपास पेंढरी पोलीस करीत आहेत