पिकअपच्या धडकेत दुचाकीचालक ठार, तर सहकारी गंभीर; वाहनचालक पसार
By गेापाल लाजुरकर | Updated: June 15, 2023 19:35 IST2023-06-15T19:35:10+5:302023-06-15T19:35:34+5:30
देसाईगंज शहराच्या कुरखेडा मार्गावरील एका राईस मिल धरमकाट्यासमोर पिकअप वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

पिकअपच्या धडकेत दुचाकीचालक ठार, तर सहकारी गंभीर; वाहनचालक पसार
गडचिराेली : देसाईगंज शहराच्या कुरखेडा मार्गावरील एका राईस मिल धरमकाट्यासमोर पिकअप वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर मागील सीटवर बसलेला किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवार १५ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान पिकअप वाहन हा वाहनासह पसार झाला.
हिराकांत नेवारे, असे अपघातात जागीच ठार झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे, रवी कांबळी यांच्या उजव्या पायाच्या मांडीचा हाड तुटला. नेवारे व कांबळी हे दाेघेही विसोरा येथील रहिवासी आहेत. रवी यांच्या जखमेतून अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. देसाईगंजवरून कुरखेडाकडे भरधाव वेगाने पिकअप वाहन जात हाेते. याच वेळी दुपारी २ वाजताच्या सुमारास विसोऱ्यावरून एमएच-३३ के ०२३५ या दुचाकीने नेवारे व कांबळी हे देसाईगंजकडे येत होते. दरम्यान भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात हिराकांत नेवारेच्या डोक्याला जबर मार लागून डाेके फुटले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या रवी कांबळी याच्या उजव्या पायाच्या मांडीचा हाड तुटल्याने भरपूर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आता देसाईगंज पोलिस पिकअप वाहन व चालकाचा शाेध घेत आहेत.