बस्तरमध्ये 'लाल दहशती'ला मोठा हादरा ! १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: March 11, 2026 15:41 IST2026-03-11T15:37:07+5:302026-03-11T15:41:06+5:30

Gadchiroli : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. ११ मार्च रोजी 'पुनर्वसन ते पुनरुत्थान' या मोहिमेतंर्गत तब्बल १०८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले.

Big blow to 'red terror' in Bastar! 108 Maoists surrender | बस्तरमध्ये 'लाल दहशती'ला मोठा हादरा ! १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

Big blow to 'red terror' in Bastar! 108 Maoists surrender

​लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. ११ मार्च रोजी 'पुनर्वसन ते पुनरुत्थान' या मोहिमेतंर्गत तब्बल १०८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले. या सर्वांवर तब्बल ४ कोटी रुपयांचे बक्षीस होते.
 
जगदलपूर येथील पोलिस समन्वय केंद्र 'शौर्य भवन' येथे दुपारी २ वाजता हा ऐतिहासिक आत्मसमर्पण सोहळा पार पडला. बस्तर विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, केंद्रीय सुरक्षा दलाचे कमांडर आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नक्षलवाद्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली. यावेळी सर्वांसमोर त्यांनी नक्षलवादाला कायमचा रामराम ठोकला. ​या सामूहिक आत्मसमर्पणानंतर बस्तरमधील नक्षली संघटनांच्या 'दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी'ला (डीकेएसझेडसी) मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

​जिल्हानिहाय आत्मसमर्पित नक्षलवादी असे....

आत्मसमर्पण केलेल्या १०८ नक्षलवाद्यांमध्ये बस्तर विभागातील विविध जिल्ह्यांतील जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
​बिजापूर: ३७,​दंतेवाडा: ३०, सुकमा: १८, बस्तर: १६, नारायणपूर: ०४, कांकेर: ०३ अशी जिल्हानिहाय संख्या आहे.

​सरकारच्या धोरणाचा प्रभाव

बस्तरमध्ये सध्या नक्षलवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन प्रहार' आणि इतर मोहिमा तीव्र करण्यात आल्या आहेत. एकीकडे दबाव वाढत असतानाच दुसरीकडे सरकारच्या     पुनर्वसन धोरणामुळे नक्षलवादी मोठ्या संख्येने मुख्य प्रवाहात येत आहेत. या धोरणांतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, घर आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Web Title : बस्तर में नक्सलवाद को बड़ा झटका: 108 माओवादियों का आत्मसमर्पण

Web Summary : बस्तर में सुरक्षा बलों को बड़ी सफलता मिली क्योंकि 108 नक्सलियों ने ऑपरेशन प्रहार और पुनर्वास नीतियों से प्रभावित होकर आत्मसमर्पण कर दिया। इन आत्मसमर्पणों, जिनमें महत्वपूर्ण इनाम शामिल हैं, दंडकारण्य स्पेशल जोनल कमेटी के लिए एक झटका है और शांति की ओर एक बदलाव का संकेत है।

Web Title : Major Blow to Naxalism in Bastar: 108 Maoists Surrender

Web Summary : Security forces achieved a major success in Bastar as 108 Naxalites surrendered, influenced by Operation Prahar and rehabilitation policies. These surrenders, involving significant bounties, mark a setback for the Dandakaranya Special Zonal Committee and signal a shift towards peace.