भोई, ढिवर, केवट समाजाचा मेळावा
By Admin | Updated: January 24, 2015 22:55 IST2015-01-24T22:55:25+5:302015-01-24T22:55:25+5:30
भोई, ढिवर, केवट, कहार, बेस्ता, ओडेवार समाजाचा मेळावा कोटगल येथे गुरूवारी पार पडला. या मेळाव्यादरम्यान आ. डॉ. देवराव होळी यांचा सत्कार करण्याबरोबरच समाजाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

भोई, ढिवर, केवट समाजाचा मेळावा
गडचिरोली : भोई, ढिवर, केवट, कहार, बेस्ता, ओडेवार समाजाचा मेळावा कोटगल येथे गुरूवारी पार पडला. या मेळाव्यादरम्यान आ. डॉ. देवराव होळी यांचा सत्कार करण्याबरोबरच समाजाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब बावणे, बाबुराव बावणे, कृष्णा कावनपुरे, डी. आर. कोरेवार, विस्तारी फेबुलवार, गजानन डोंगरे, एस. के. बावणे, एन. डी. मेश्राम, उखंडराव राऊत, हरबा धनकर, दिवाकर भोयर, मीनाक्षी गेडाम, लता मेश्राम, ज्योती मेश्राम, गणपती बावणे, दादाजी कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान भोई, ढिवर, केवट समाजाच्या समस्यांवर चर्चा करून सदर समस्या आमदारांना अवगत करून देण्यात आल्या. मार्गदर्शन करताना आ. डॉ. होळी यांनी वनहक्क तसेच पेसा कायद्यात संस्थेला तलाव मिळण्याकरिता अडीअडचणी दूर करू, असे आश्वासन दिले.
भोई, ढिवर, केवट समाजाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी समाजाने एकत्र यावे, असे मार्गदर्शन भाऊसाहेब बावणे यांनी केले. मेळाव्याला कोटगल, इंदाळा, पारडी, विसापूर, मुरखळा, नवेगाव, मुडझा, गोविंदपूर, येवली, गुरवळा, अडपल्ली, गोगाव, हिरापूर, कुरपळा, राखी, विहीरगाव, जेप्रा, दिभना, अमिर्झा, साखरा, काटली, गडचिरोली येथील समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)