शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपंग आचलच्या यशाला शिक्षक भारतीची ‘शाब्बासकी’

By admin | Updated: June 17, 2015 02:35 IST

कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयातील दोन्ही हातांनी अपंग असलेल्या आचल राऊत

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयातील दोन्ही हातांनी अपंग असलेल्या आचल राऊत या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ७७.४० टक्के गुण मिळविले आहे. आचलच्या या यशाचे शिक्षक भारती संघटनेने पाच हजार रूपयांची भेट आचलला देऊन तिचे कौतुक केले.
लोकमत कार्यालयात मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष एम. एन. चलाख, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुनिल चौरासिया आचलचे वडील प्रदीप राऊत, आचल व धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डी. टी. कोहाडे, व लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या कौतुक सोहळ्यात बोलताना चलाख यांनी आचलच्या जिद्द व चिकाटी या गुणांचे कौतुक करून पायलचे यश सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. आचलच्या या यशाची गौरवगाथा शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनाही आपण सांगितल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चलाख यांनी आपल्यातर्फे पाच हजार रूपयांचे धनादेश आचल व आचलचे वडील प्रदीप राऊत यांना सुपूर्द केला. भविष्यातही आवश्यक ते सहकार्य आचलला करू, असेही चलाख यांनी या कार्यक्रमात सांगितले. लोकमतमध्ये आचलच्या यशाची बातमी पहिल्यांदा वाचली व त्यातूनच तिला मदत करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच लोकमतच्या पुढाकारातून तिला भेट म्हणून पाच हजार रूपये देण्याचा निर्णय आपण घेतला, असेही चलाख यांनी यावेळी सांगितले.

विज्ञान शाखेच्या शिक्षणातून करिअर घडविणार!
४आचलची आई घाटी येथील शासकीय आश्रमशाळेत महिला अधीक्षक पदावर कार्यरत आहे. आचलने वर्ग १ ते ७ पर्यंतचे शिक्षण कोरची येथे आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. आठवी ते दहावीचे शिक्षण कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालय घाटी येथून पूर्ण केले व आता अकरावी विज्ञान शाखेत कुरखेडा येथील विद्याभारती महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. विज्ञान शाखेच्या शिक्षणातून करिअर घडविणार असे तिने यावेळी सांगितले.