शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड हादरले, माजी पंचायत समिती सभातीची नक्षल्यांकडून हत्या, मृतदेहाजवळ टाकले पत्रक

By संजय तिपाले | Updated: February 2, 2025 12:32 IST

पेनगुंडात पोलिस मदत केंद्र स्थापन करण्यास मदत केल्याचा आरोप...

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलिस मदत केंद्र स्थापन केल्याने बिथरलेल्या नक्षल्यांनी कियेर (ता. भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (४५) यांची हत्या केली. २ फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रक टाकले. त्यात मृत व्यक्तीने पेनगुंडा येथे पोलिस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.अतिदुर्गम भागाती नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात त्यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलिस मदत केंद्र उभारण्याची किमया केली. डिसेंबर महिन्यात पेनगुंडा गावाजवळ पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात आले. त्यानंतर नेलगुंडा येथे ३० जानेवारीला पोलिस मदत केंद्र उघडण्यात आले. यामुळे छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात सहज प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांची नाकाबंदी झाली होती. नक्षल्यांच्या प्रभाव क्षेत्रात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मजबूत होत असल्याने हिंसक चळवळीला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, १ फेब्रुवारीला रात्री तीन नक्षल्यांनी कियेर गावातून माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी यांना उचलले व जंगलात नेले. तेथे त्यांची गळा दाबून हत्या केली. मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी असल्याचा दावा केला आहे.कंपनी क्र. १० वर संशय दरम्यान, भामरागड परिसरात माओवाद्यांच्या कंपनी क्र. सध्या ८ जण सक्रिय आहेत. त्यातील तिघांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तथापि, या भागात गेल्या काही वर्षांत पोलिसांनी नक्षल्यांविरोधात धडक कारवाया केल्या, त्यात जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर काहींनी आत्मसमर्पण केले. मृत व्यक्ती पोलिसांचा खबरी नव्हता. मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकावरून तपास सुरू केला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDeathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस