शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

धानासह सोयाबीन पिकावर रोग बरसला

By admin | Updated: September 30, 2014 23:36 IST

गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागानेही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना रोग प्रतिबंधक उपाययोजना सुचविल्या आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानपीकाचे क्षेत्र १ लाख ४९ हजार २६० हेक्टर आहे. सोयाबीन पिकाचे क्षेत्र ६ हजार ३२० हेक्टर, कापूस १ हजार २८० तर तूर ४ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर आहे. खरीप हंगामातील पीक सध्या वाढीव अवस्थेत आहे. पावसात खंड पडल्यामुळे रोवणीचे काम मध्यंतरी खोळंबली होती. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या व सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने रोवणीचे काम आटोपले असून जिल्ह्यात नियोजीत सर्व क्षेत्रावर पीक घेण्यात येत आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे. मात्र भाताचे पीक सध्या फुटव्याच्या व पोटऱ्या येण्याच्या अवस्थेत असताना समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले येईल, अशी आशा होती. मात्र भात पीकावर तुरळक प्रमाणात पाने गुंडाळणारी अळी व खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच करपा व कडा करपा या रोगाचासुध्दा काही भागात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्चही फवारणीच्यासाठी नियोजित अंदाजपत्रकापेक्षा वाढत आहे. यंदा पाऊस उशीरा आल्याने मजुरीचा व मशागतीचा खर्चही वाढला आहे. दरवेळी ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा शेतकऱ्यांना फवारणीचे अधिक डोज द्यावे लागत आहे. सोयाबीन पिकावरही हिरवी उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना यावर उपाययोजना सुचवित असले तरी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक किडीच्या प्रादुर्भावामुळे हातून जाण्याच्या परिस्थिती आहे. कपाशीचे पीक फूल व बोंड पकडण्याच्या अवस्थेत आहे. उशीरा पेरणी झालेले पीक वाढीव अवस्थेत आहे. कापसावरही तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर पीकावर मर आणि पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकूणच खरीप हंगामातील चारही प्रमुख पीक किडीच्या विळख्यात सापडल्याने बळीराजाचे डोळे पाणावलेले आहेत. यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली. कर्ज काढून शेतकरी शेती करीत असताना आता हातातोंडाशी आलेले पीक किडीच्या प्रादुर्भामुळे उद्ध्वस्त होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे.