शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

१७९०० शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होण्यासाठी १५ जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.  याबाबत सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची राहणार  आहे. 

ठळक मुद्देगेल्यावर्षीचा हंगामात ७ काेटींची भरपाई, यावर्षीच्या हंगामासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात ३७ हजार १८४ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी १७ हजार ९०० शेतकऱ्यांना ७ कोटी २२ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मंजूर झाले. यावर्षीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.पीक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होण्यासाठी १५ जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. याबाबत सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची राहणार  आहे. प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यासह अग्रणी जिल्हा प्रबंधक युवराज टेंभुर्णे, उपविभागीय कृषी अधिकारी भाऊसाहेब कदम, गुण नियंत्रण अधिकारी संजय मेश्राम, तंत्र अधिकारी शीतल खोबरागडे, मंडळ कृषी अधिकारी चलकलवार उपस्थित होते.

केव्हा मिळू शकतो विम्याचा लाभ?हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न होणे, पिकांच्या हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, यामध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूसंखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींचा समावेश आहे. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीपश्चात होणारे पिकांचे नुकसान याचाही यात समावेश असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता- तांदूळ (भात) पिकासाठी- विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर ३१,२५० रुपये व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर ६२५ रुपये इतका आहे.- सोयाबीन पिकासाठी- विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर ३४५०० रुपये असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर ६९० रुपये इतका आहे- कापूस पिकासाठी - विमा संरक्षित रक्कम प्रतीहेक्टर रुपये ३५७५० रुपये असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रतीहेक्टर १७८७.५० रुपये इतका आहे.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी