शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
4
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
5
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
6
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
7
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
8
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
9
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
10
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
11
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
12
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
13
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
14
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
15
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
16
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
17
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
18
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
19
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
20
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
Daily Top 2Weekly Top 5

वाहकाकडून असभ्य वागणूक

By admin | Updated: June 25, 2015 02:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली-अमरावती या बसमध्ये गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याला

विभागीय नियंत्रकाकडे तक्रार : ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याचा केला अपमान
गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली-अमरावती या बसमध्ये गडचिरोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याला वयाच्या दाखल्यावरून परिवहन महामंडळाच्या वाहकाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराकडे परिपत्रकही उपलब्ध नसल्याची बाब ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या पत्र व्यवहारानंतर उजेडात आली.
राज्य सरकारच्या २५ जानेवारी १९९६ व २१ जून २००८ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या व निमआराम बसमध्ये ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत अनुज्ञेय केलेली आहे. मात्र वाहकाच्या मनमानीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांजवळ वयाचा पुरावा असूनही त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गडचिरोली येथील सेवानिवृत्त तहसीलदार व ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रादेशिक विभागाचे कोषाध्यक्ष दत्तात्रय नारायण बर्लावार हे ३ मे २०१५ ला नागपूरला जाण्यासाठी गडचिरोली-अमरावती बस क्रमांक एमएच ४०-५७६२ ने सकाळी ५.४५ वाजता निघाले. त्यांच्याकडे तहसीलदारांनी दिलेले वयाबाबतचे ओळखपत्र होते. सदर एसटी बसच्या वाहकास त्यांनी ते ओळखपत्र दाखविले. तहसीलदाराने दिलेले हे ओळखपत्र बोगस आहे व यापुढे हे बस प्रवासात दाखवू नका, अशी तंबी बर्लावार यांना सदर बसच्या वाहकाने दिली, अशी माहिती बर्लावार यांनी लोकमतला दिली आहे. विभागीय नियंत्रकास व गडचिरोली येथील आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे ५ मे २०१५ रोजी तक्रार दिली. परंतु त्यांच्याकडूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाचे वाहक नाहक अपमानास्पद वागणूक देत आहे, असा आरोप बर्लावार व डी. डी. सोनटक्के यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
परिपत्रकही दिले नाही
बर्लावार यांनी ४ मे २०१५ ला एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकास तक्रार नोंदविली. त्यावेळी गडचिरोली बसस्थानक व्यवस्थापक बावणे यांना ही तक्रार देण्यात आली. ज्येष्ठांच्या ओळखपत्राच्या वैधतेबाबत एसटी महामंडळाचे काही वेगळे परिपत्रक असल्यास ते दाखवावे, असा आग्रह धरण्यात आला. मात्र बसस्थानक व्यवस्थापकांनी परिपत्रकाची शोधाशोध केली. परंतु त्यांना ते सापडले नाही. ४८ दिवसांचा कालावधी लोटला. परंतु त्यांच्याकडून अद्यापही परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.