तलावाच्या खोलीकरणाला सुरूवात
By Admin | Updated: May 24, 2017 00:29 IST2017-05-24T00:29:35+5:302017-05-24T00:29:35+5:30
गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या खोलीकरणाला जलसंपदा विभागाच्या मार्फत मंगळवारपासून सुरूवात झाली आहे.

तलावाच्या खोलीकरणाला सुरूवात
गडचिरोलीतील तलाव : अतिक्रमणधारकांमध्ये घबराट; पाणी साठवण क्षमता वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या खोलीकरणाला जलसंपदा विभागाच्या मार्फत मंगळवारपासून सुरूवात झाली आहे.
गडचिरोली शहराच्या अगदी मध्यभागी तलाव आहे. या तलावाच्या सीमा गोकुलनगर व गणेश नगराला लागून आहेत. या बाजुने काही नागरिकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत चालला आहे. अशातच जलसंपदा विभागाने या तलावाच्या खोलीकरणाच्या मंगळवारपासून कामाला सुरूवात केली आहे. जलसंपदा विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचे दोन पोकलँड मशीन, पाच ट्रक, एक जेसीबीच्या सहाय्याने गाळाचा उपसा केला जात आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहत असलेल्या भागापर्यंत काही नागरिकांनी पाच फुटापेक्षा अधिक पायवा तयार केला आहे. जलसंपदा विभागाच्या मशीन दाखल होताच या तलावात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.