होळी पेटविताना काळजी घ्या, अन्यथा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:30 IST2021-03-26T05:00:00+5:302021-03-25T23:30:28+5:30
होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या. होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा.

होळी पेटविताना काळजी घ्या, अन्यथा...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा उत्साह सांभाळून करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या. होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणतांना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या. विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही अपघातास कारणीभूत ठरू शकते.
रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकतांना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. ओले कपडे, ओल्या चिंध्या विजेच्या तारावर फेकण्याचे टाळावे कारण अशा ओल्या कपड्यामुळे दोन फेजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. तसेच वीज तारांवर अशा कपड्यांमुळे पावसाळ्यात दोन फेज मध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. विशेषत: बालकांना रंगोत्सव साजरा करतांना सांभाळून व मोठ्यांच्या निगराणीखाली वीज यंत्रणापासून लांब ठेवून साजरा करू द्यावा. वीज वितरण यंत्रणेचे रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतारावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेचा खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबासभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा आनंद सांभाळून करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
रासायनिक रंगांमुळे त्वचेला धाेका
बाजारपेठेत नैसर्गिक व रासायनिक असे दाेन प्रकारचे रंग उपलब्ध राहतात. रासायनिक रंग एकदम भडक राहतात. तसेच जास्त पाण्यात त्यांचा वापर करणे शक्य हाेते. नैसर्गिक रंगांच्या तुलनेत हे रंग स्वस्त पडत असल्याने काही नागरिक रासायनिक रंग खरेदी करतात. मात्र या रंगांचा वापर करणे त्वचेसाठी धाेकादायक ठरू शकते. डाेळ्यांना इजा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारपेठेत नैसर्गिक रंग सुद्धा उपलब्ध आहेत. बहुतांश नागरिक याच रंगांचा वापर करतात. काही रंग पाण्यात भिजवून वापरावी लागतात. काही रंग सुके वापरता येतात.
हाेळीच्या सणावर काेराेनाचे संकट
मागील वर्षी लाॅकडाऊन हाेण्यापूर्वीच हाेळीचा सण आला हाेता. त्यामुळे काेणत्याही निर्बंधाशिवाय मनमाेकळेपणाने नागरिकांनी हाेळीच्या सणाचा आनंद लुटला हाेता. यावर्षी मात्र काेराेनाचे संकट आहे. प्रत्येक दिवशी काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे हाेळीचा सण साजरा करताना तसेच रंग खेळताना नागरिकांनी याेग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.