भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:28 IST2018-03-16T00:28:51+5:302018-03-16T00:28:51+5:30
तालुक्यातील विसामुंडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले होते.

भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द
ऑनलाईन लोकमत
भामरागड : तालुक्यातील विसामुंडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवित विसामुंडी येथील नागरिकांनी तीन भरमार बंदुका, दोन नळ्या व इतर साहित्य पोलिसांकडे सुपूर्द केले.
यावेळी नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक गणेश होळकर, किरण वाघ, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट प्रसन्ना आदी उपस्थित होते. दुर्गम भागात शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी पोलीस विभाग नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या बंदुका सुपूर्द करण्याचे आवाहन करीत आहे. या आवाहनाला बहुतांश गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. ही मोहीम आणखी पुढे चालू ठेवण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.